Akola : आजपासून ऑनलाइन पशुगणना; पशुसंवर्धन विभागाकडून तयारी; २१ वी पशुगणना चार महिने चालणार

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ सप्टेंबर २०२४ पासून पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना ही २१ वी असून ती एकाच वेळी राज्यात राबविली जाणार आहे.
animal census
animal censussakal
Updated on

नांदुरा : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ सप्टेंबर २०२४ पासून पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना ही २१ वी असून ती एकाच वेळी राज्यात राबविली जाणार आहे. प्रथमच ऑनलाइन पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारी केल्याची माहिती मिळत आहे. नांदुरा तालुक्यात जवळपास ४० हजार कुटुंब संख्येसाठी १४ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.