Online Fraud : ऑनलाइन व्यवहार फसवणुकीतील ३३ लाखांचा लागला छडा; १९ लाख फिर्यादींना परत

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे जेवढे सोईचे सोपे वाटत आहे तेवढेच ते आता दिवसेंदिवस अडचणीचे ठरत आहे.
Online Fraud
Online Fraudsakal
Updated on

अकोला - आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र या माध्यमातून मिळणारे प्रलोभन व आमिषाला बळी पडून अनेक जण आर्थिक अडचणीत येतात. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झालेल्या नागरिकांचे १९ लाख रुपये संबंधितांना अकोला सायबर विभागाने परत केले असून ३३ लाख ७२ हजार रुपये रोखून धरले आहेत.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे जेवढे सोईचे सोपे वाटत आहे तेवढेच ते आता दिवसेंदिवस अडचणीचे ठरत आहे. अपुऱ्या ज्ञानाचा सायबर गुन्हेगार फायदा उचलत असून उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे ही काळाची गरज आहे.

दरम्यान माहे जानेवारी २०२४ पासून ते आतापर्यंत सायबर पोलीस स्टेशन अकोला यांनी अशा प्रकारच्या विविध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकूण १८ लाख ९८ हजार ५२५ रुपये रक्कम नागरिकांना परत करण्यात यश मिळविले आहे. तसेच ३३ लाख ७२ हजार ३३६ रुपये रक्कम सायबरांनी रोखून ठेवली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. शंकर शेळके व सर्व सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी केली.

जाहिरातला बळी पडून नका

सध्या सोशल मिडीयावर बनावट अकाउंटवरून शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविल्याबाबतचे विविध जाहिराती, व्हिडीओ दाखवुन नागरिकांना प्रलोभन दाखविले जाते अशा प्रकारच्या जाहिरातला बळी पडून अनेक जणांची फसवणूक करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या फसव्या जाहिरातीला प्रतिसाद देणे टाळावे.

बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनिधी केवायसी अपडेट करण्याच्या नावावर तर कधी आपल्याकडे थकीत असलेल्या इलेक्ट्रिक बिलापोटी आपले वीज कनेक्शन बंद होणार असल्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूक केली जाते, त्याला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बचावासाठी उपाययोजना

आपल्या बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा एटीएम कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवू नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक अथवा ॲप्लीकेशन कोणाच्या सांगण्यावर डाउनलोड करू नये, सीम कार्ड अपडेट अथवा केवायसी अपडेट आणि इलेक्ट्रिक बिल भरण्याच्या नावाखाली आलेल्या संदेशाला प्रतिसाद देवू नका.

ओ. एल. एक्स. सारख्या ॲपवरून अनओळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलच्या १९३० क्रमांकावर तक्रार करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.