मंगरूळपीर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश धोरणांतर्गत यंदाच्या सत्रात समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक नियमित तर दुसरा स्काऊट गाईडचा गणवेश देण्याची घोषणा केली.
प्रत्यक्षात यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता दहा दिवस उलटत आले तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नियमित गणवेश वितरित करण्यासाठी अद्याप कापडही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असून, स्वातंत्र्यदिनानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
समग्र शिक्षाअंतर्गत राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. गतवर्षीच्या शासन निर्णयानुसार दारिद्र्यरेषेवरील मुलांनाही या गणवेशाचे वितरण करण्यात येत आहे. आता यंदा नियमित गणवेश व स्काऊट गाइडचा गणवेश असे दोन गणवेश देण्यात येणार आहेत.
नियमित गणवेश महिला बचत गटामार्फत शिलाई करून शासनस्तरावरून मिळणार आहे, तर स्काऊट गाईडच्या गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला कापड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रत्यक्षात यंदाचे शैक्षणिक सत्र हाेऊन दहा दिवस उलटत आले तरी शासनाकडून जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्यासाठी अद्याप कापडच उपलब्ध करून देण्यात आले नाही. स्वातंत्र्यदिन अवघा महिनाभरावर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानंतर गणवेश मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणवेशासाठी बचत गटांना आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना कापड उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही त्यांच्याकडून गणवेशाची शिलाई करून तो विद्यार्थ्यांना वितरीत करण्यास बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळणार की नाही, अशीही शंका उपस्थित होत आहे.
गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पहिला
गणवेश वेळेत वितरीत करण्यात आला. त्यातही अनेक अडचणी
आल्या होत्या. तर दुसरा गणवेश मिळण्यास मात्र बराच विलंब
झाला होता. आता यंदाच्या शैक्षणिक सत्रात तशी वेळ येऊ नये,
म्हणून शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे.
शासनस्तरावर अद्याप नियमित आणि स्काऊट गाईडच्या गणवेशासाठीही कापड उपलब्ध झालेले नाही. लवकरच हे कापड उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वीच मोफत गणवेशांचे वितरणही होऊ शकेल.
— गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. वाशीम
वाशिम - १४,३३४
रिसोड- १०,६१८
मालेगाव -११९०५
कारंजा -११,९८०
मानोरा- ९,१०९
मंगरुळपीर -१०,६६१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.