हिवरखेड सरपंचपदाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल

A petition has been filed in the Nagpur Bench of the Mumbai High Court regarding the reservation of the post of Sarpanch of Hivarkhed.
A petition has been filed in the Nagpur Bench of the Mumbai High Court regarding the reservation of the post of Sarpanch of Hivarkhed.
Updated on

हिवरखेड (अकोला) : हिवरखेड ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून अनुसूचित जातीकरिता सरपंच पदाचे आरक्षण न निघाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनिल मोतीरामजी इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हिवरखेडचे सरपंच पदाच्या आरक्षणा संबंधित याचिका दाखल केली आहे. ही प्राथमिक माहिती सदर याचिकेमध्ये अकोला जिल्हाधिकार्‍यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

तत्पूर्वी हिवरखेडचे सरपंच पद अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात यावे, या मागणीसाठी सुनील इंगळे यांनी ग्राम विकास मंत्री, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, इत्यादींसह वरिष्ठांना निवेदने दिली होती. सदर याचिका दाखल केल्यामुळे हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये सध्या निघालेले खुल्या प्रवर्गासाठी महिला आरक्षण कायम राहते की स्थगिती मिळते? आणि 11 फेब्रुवारी रोजी नियोजित सरपंचपदाची निवड त्याच दिवशी होते की पुढे ढकलल्या जाते? याबाबत संभ्रम वाढला असून उच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.