Akola; ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!

PM Kisan Sanman Yojana
PM Kisan Sanman YojanaEsakal
Updated on

अकोला ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६८ हजार ७०१ शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे मानधन जमा झाले आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सदर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. (PM Kisan Yojana funds in the account of farmers in Akola)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना वर्षाला त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

PM Kisan Sanman Yojana
अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास दोन लाखांवर शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

PM Kisan Sanman Yojana
कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?

दोन लाखांवर लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला
योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर लाभार्थी शेतकऱ्यांना योजनाचा तिसरा हप्ता मिळाला आहे. तर दोन लाख १६ हजार ४३३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लाभार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.

निवडणुका आणि कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे विलंब
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी २-२ हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. आठव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली होती. तथापि, पाच राज्यांमधील निवडणुका आणि कोरोना संसर्ग वाढण्याच्या घटनांमुळे पैसे देण्यास विलंब झाला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी १४ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता जमा केला. परंतु जिल्हा प्रशासनाकडे त्याची माहिती येण्यास विलंब लागला.

PM Kisan Sanman Yojana
सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे


शेतकऱ्यांना मिळालेले मानधन (लाभार्थी शेतकरी)
- पहिला हप्ता - २ लाख १६ हजार ४३३
- दुसरा हप्ता - २ लाख ११ हजार ८९६
- तिसरा हप्ता - २ लाख ३ हजार ४३५
- चौथा हप्ता - १ लाख ८७ हजार ९८०
- पाचवा हप्ता - १ लाख ४२ हजार ९१६
- सहावा हप्ता - १ लाख ३५ हजार ५७६
- सातवा हप्ता - १ लाख २२ हजार १९०
- आठवा हप्ता - ६८ हजार ७०१

संपादन - विवेक मेतकर

PM Kisan Yojana funds in the account of farmers in Akola

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.