बुलडाणा : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वैतागला आहे. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या उत्पन्नामुळे आर्थिक संकटातही कोसळले आहे. यातच दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. उसनवारी आणि कर्जाचा बोझा करून दुबार पेरणी केली. परंतु, उगवलेले पीक करपल्याने चिखली तालुक्यातील कारखेड येथील शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन (Poison taken by a farmer couple) केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. (Poison-taken-by-a-farmer-couple-in-Buldhana-district)
अल्पभूधारक असलेले शेषराव भगवान मंजुळकार (वय ६० वर्ष) व जनाबाई शेषराव मंजुळकार (वय ५१ वर्ष) यांच्याकडे केवळ दोन एकर शेती आहे. पहिल्यांदा पेरा करूनणही पीक उगविले नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी केली. दुसऱ्यांदा पेरणी केली असता पीक उगविले; परंतु, पाण्याअभावी करपले असून, त्यावर आता नांगर भिरविल्याशिवाय इलाज नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन केले. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांचीही परिस्थिती चिंताजनक आहे.
परिवारात दोन मुले आणि चार मुली असून, सर्व विवाहित आहे. सदर दाम्पत्य हे शेतीसेाबतच दगड फोडणे व मजुरी सुद्धा करतात. पत्नीला अर्धांगवायू आजार आणि दुबार पेरणीनंतरही हाती काही न लागणार असल्याच्या चिंतेमुळे सदर दाम्पत्याने रात्री राहत्या घरात विषारी औषध प्राशन केल्याचे कळते. याबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद नसून, रुग्णालयात उपचार सुरू आहे.
(Poison-taken-by-a-farmer-couple-in-Buldhana-district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.