Akola Crime : नकली नोटा देण्याचे आमिष प्रकरणात पोलिस कर्मचारी आरोपी!

२० लाख रुपयांमध्ये ५०० च्या ४० लाख रुपयांच्या नकली नोटा देऊन बाजारात चलनात आणण्याचे आमिष.
Crime
Crimesakal
Updated on

अकोला - २० लाख रुपयांमध्ये ५०० च्या ४० लाख रुपयांच्या नकली नोटा देऊन बाजारात चलनात आणण्याचे आमिष दाखवून तीन जणांच्या टोळीने वाशिम येथील कापड व्यावसायिकाची १७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या फसवणुकीत बडनेरा येथील एका पोलिस कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्यात आहे. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाशिम येथील संदेश हुकूमचंद डहाळे (वय ३७) यांना आरोपी रोहित किशोर काळे (२५, रा. नगरपरिषद चौक, वाशिम, देवराव ऊर्फ देवा भाऊराव हिवराळे (रा. चितोडा, ता. खामगाव) यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीने २० लाखांत ४० लाखांच्या त्या नोटा बाजारात चलनात आणण्याचे आमिष दाखविले आणि संदेश डहाळे यांच्याकडून १७ लाख रुपये घेऊन आरोपी रोहित किशोर काळे पसार झाला.

या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी तपास करून वाशिमच्या रेल्वेस्टेशनवरून १९ डिसेंबर रोजी रोहित काळे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून बडनेरा येथे कार्यरत सुनील कडू नामक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव समोर आले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याने, रेल्वे पोलिसांनी त्याला आरोपी करून न्यायालयात हजर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.