Akola News : जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठाणेदारांना गुन्हेगारांवर वचक बसविण्यासोबतच महिलांची व सार्वजनिक मालमत्तांची सुरक्षा आणि गोवंश तस्करी रोखण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉल येथे सर्व ठाणेदारांची आढावा बैठक घेतली. संपूर्ण जिल्ह्याचा त्यांनी तुलनात्मक आढावा घेतला. यात व्हिजीबल पोलिसींग, रात्र गस्त दरम्यान क्यू आर कोड स्कॅनिग, सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का कायद्याअंतर्गत प्रतिंबंधक कारवाई करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिल्यात.
अवैध प्रवासी वाहतूक, फॅन्सी नंबर, विना हेल्मेट, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही पोलिस अधीक्षकांनी केली. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार, सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
सन २०२३ या वर्षात उत्कृष्ट तपास, गुन्हे उकल, मुद्देमाल हस्तगत, क्लिष्ट तपास करणारे, डॉरमन फाईलमधील आरोपी अटक, एमपीडीए कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या एकूण ७२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने पातूर येथील ८० लाखांची चोरी उघड करणारे आणि पिंजर घटनेतील मुलाचा शोध घेवून खूनाचा गुन्हा उघड करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.