Akola News : अकोटात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

चक्क शेतातल्या फणसाच्या झाडाखाली सुरू होता जुगार अड्डा..
Akola News
Akola News esakal
Updated on

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलिसांनी शेतातील फणसाच्या बगीच्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या जुगार अड्ड्यावर पोलिस निरीक्षक किशोर जूनघरेंनी थेट कारवाई करत हा अड्डा पूर्णपणे उद्धवस्त केला. हे घडलंय अकोट तालुक्यातील अडगाव ख़ुर्द इथे. इथल्या एका शेतातल्या जुगाराच्या कारवाई दरम्यान 7 लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Akola News
Mumbai News: मेट्रो स्थानक परिसरातील गटारांची दुरूस्ती कधी होणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असतांना माहिती मिळाली की, अड़गाव ख़ुर्द येथील प्रविण सोनोने यांच्या शेतशिवारातील फणसाच्या बगीच्यामध्ये काही लोक जुगार खेळत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठया प्रमाणावर दुचाकी वाहने पार्किंग केलेली दिसून आल्याने पोलिसांना जुगार अड्डा सुरु असल्याची खात्री पटली. दरम्यान पोलिसांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन लांबून पाहणी केली, शेतातल्या फणसाच्या झाडाखाली काही लोक पत्यावर रमी नावाचा जुगार खेळतांना दिसून आले. यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकून छापा टाकला. पोलिसांकडून अचानक करण्यात आलेल्या कारवाईने जुगाऱ्यांची धांदल चांगलीचं उडाली. त्यामुळे मिळेल त्या दिशेने ते सैरावैर पळत सुटलेत. परंतु तरीही पोलीसांच्या पथकानं त्यांचा पाठलाग करत काही वेळातच् त्यांना ताब्यात घेतले. 

कारवाईदरम्यान तब्बल सात लोकांना ताब्यात घेण्यात आले. अब्दुल आकीब अब्दुल आरीफ (वय ३१ वर्ष, रा. पणज ता. अकोट), प्रविण किसनराव सोनोने (वय ४३ रा. अडगाव खु ता. अकोट), निळु वासुदेव गवई (वय ३८ वर्ष, रा. पणज ता. अकोट), दिलीप साहेबराव गवई (वय ३८ वर्ष, रा. अडगाव खु ता. अकोट), विनोद साहेबराव सोनोने (वय ४२ वर्ष रा. अडगाव खु), वसीम शहा शब्बीर शहा, राजीक अब्दुल खालीद या लोकांना पकडण्यात आले. त्यांचाकडून जुगार साहित्य सह मोटरसायकली असा एकत्रित 3 लाख हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.