अकोला : सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’ असणार आहे. आक्षेपार्ह पोलिस टाकल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून गत तीन वर्षात ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या सण-उत्सवाचा काळ असल्याने सोशल मीडियावर पोलिसांचे अधिक लक्ष असणार आहे.