राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा

राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा
Updated on

अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हा परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाच्या सदस्यांच्या अडचणी व पुढील रणनिती ठरवण्यासाठी सोमवारी (ता. २१) जिल्हा परिषदेच्या कारभारवर वॉच ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समन्वय समितीने जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या दालनात बंदद्वार बैठक घेतली. बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वच सदस्य उपस्थित होते. (Politics escalated after the resignation of Akola Zilla Parishad president)

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रतीभा भोजने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची बाब शुक्रवारी (ता. १८) समोर आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु त्यांचा राजीनामा अद्याप वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप स्वीकार न केल्यामुळे ॲड. आंबेडकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हा परिषदेत कमालीच्या घडामोडी घडत आहेत.

राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा
नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड

कारभाराचा अनुभव नसने व पक्षातील सदस्यांच्या तक्रारींमुळे अध्यक्ष भोजने यांनी राजीनामा दिला असल्याने इतर पदाधिकाऱ्यांची सुद्धा धाकधूक वाढली आहे. असे असतानाच जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर वॉच ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समन्वय समितीचे सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे व दिनकर खंडारे यांनी वंचितच्या सर्वच जिल्हा परिषद सदस्यांसोबत संवाद साधला. बैठकीत अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, व इतरांची उपस्थिती होती.

राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा
होणाऱ्या पती समोरच प्रेयसीला वाहनातून पळविले

या विषयांवरही झाली चर्चा
- जिल्हा परिषद सदस्यांसोबत पार पाडलेल्या बैठकीत बुधवारी (ता. २३) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीतरित्या पार पडावे यासंदर्भात समन्वय समितीच्या सदस्यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती आहे.
- जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे मतदार संघ (सर्कल) मधील कामे व करण्यात येणाऱ्या विकास कामांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्याने मतदार संघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या संपर्कात रहावे, असा कानमंत्र यावेळी देण्यात आला.

राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन

https://www.youtube.com/watch?v=dDOGcnEoDT0&list=PLmt3HAEtseKpmONVJl9s9Bo7JTfS1jpVJसीईओंसोबत केली चर्चा
सदस्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर समन्वय समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यासोबत जिल्हा परिषदेतच चर्चा केली. त्यामध्ये विकास कामे व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभावर सुद्धा चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत समन्वय समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

संपादन - विवेक मेतकर

Politics escalated after the resignation of Akola Zilla Parishad president

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.