अकोला : बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखाण्यावर धाड

२० लाखांचा मुद्देमाल जप्त; एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे शाखेची कारवाईsakal
Updated on

अकोला : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी गुरुवारी कारवाई केली. या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सध्या मॉन्सून पेरणी हंगाम सुरू आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा असताना एक इसम एमआयडीसी अकोला येथे बनावट खत बनवून बाजारात विक्री करीत असल्याची माहिती मिळाही होती. शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करीत असल्याच्या माहितीवरून पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व सहकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी अकोला यांचे संयुक्त पथकाने एमआयडीसी फेज चार मधिल एमआर फर्निचर मॉलचे बाजूला असलेल्या भंगार गोडावूनचे बाजूचा गोडावूनमध्ये धाड टाकली. त्याठिकाणी आरोपी नामे राहुल नामदेव सरोदे (३५ रा.नगर परिषद कॉलनी गौरक्षण रोड,अकोला) हा अवैधरित्या बनावट खताचे उत्पादन करताना मिळून आला.

त्याचे कडून सरदार डीएपीखत, आयपीएल डीएपी खत, महाधन १८:४६:० असा नामवंत खताचे पॅकिंगसाठी वापरात येणाऱ्या नवीन प्लास्टीक बारदाना, पॅकीग मशीन, बनावट रासायनिक खताचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स, सोडीयम सल्फेटचा कच्चा माल, इमलसीफायर लिक्वीड, खत बनविण्यासाठी वापरात येणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकूण २० लाख पाच हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे कलम ४२० भा.द.वि.सह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५, कलम ३, ९ अत्यावश्यक वस्तू कायदा १९६८, कलम ९, ३ किटकनाशक नियम १९७१,कलम ४,६,९,१०,१५ किटकनाशक आदेश १९८६, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी राहुल नामदेव सरोदे यास अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीमती मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोपाल जाधव, ए.एस.आय. दशरत बोरकर, नितीन ठाकरे, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, स्वप्निल खेडकर, अन्सार, अक्षय बोबडे, कृषी विकास अधिकारी जि.प.अकोला डॉ. एम. बी इंगळे, मोहम अधिकारी एम.डी.जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकएन एस लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. आर. जांभरूणकर व कृषी अधिकारी पं.स.अकोला कु. रोहिणी मोघाड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.