अकोला : बनावट शेती उत्पादने, खते, रसायने कारखान्यावर छापा

पाच लाखांचे साहित्य जप्त; कृषी विभाग व पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
Fake chemical
Fake chemicalSakal
Updated on

अकोला - जिल्ह्यातील सीसा बोंदरखेडा रोडवरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढ़विनारे खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून आरोपीस अटक केली. या कारवाईत पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. डोंगरगांव सांगळुद रोडावरील सीसा बोंदरखेडा शेतशिवारातील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढ़विनारे खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखाना चालविला जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली.

आरोपी विनोद ज्ञानदेव हिवराळे (३३, रा. बोथाकाजी जि. बुलडाणा) हा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता शेतीचे उत्पन्न वाढविणारे उत्पादने बनवत होता. पथकाने त्याच्या ताब्यातून रेस गोल्ड, गोल्डन प्लस, प्लेटिना प्लस, पॉवर बुस्ट, थ्रीडी प्लस, कॉटन पीजीआर, असे शेती प्रॉडक्ट बनविणारे साहित्य, असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ४२९ , जीवनाशयक वस्तू अधिनियम कलम तीन, सात ईसी कायदा, तसेच खत नियंत्रण आदेश १९८५, सात,३५, २१ या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील, जिल्हा कृषी अधीकारी एम. बी. इंगळे, मिलिंद जवंजाळ, मोहीम अधिकारी संजय गवळी, ग्राम विकास अधिकारी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.