Akola Rain Forecast : अकोला जिल्ह्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

Akola Weather Update : जिल्ह्यात यंदा मृग नत्राच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता घटल्याचे दिसून आले. ७ जून रोजी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
Akola Rain Forecast
Akola Rain Forecast Sakal
Updated on

Akola News : जून महिना संपायला एक-दोन दिवस शिल्लक असल्यानंतर सुद्धा अद्याप जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसह पेरणी न केलेले शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान पुढील सहा दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात यंदा मृग नत्राच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता घटल्याचे दिसून आले. ७ जून रोजी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला व ४५ डिग्रीपर्यंत गेलेल्या तापमानात घट झाली.

पावसाच्या आगमणाने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला परंतु गर्मीपासून मात्र नागरिकांची सुटका झाली नाही. त्यानंतर १४ ते १५ जूनपर्यंत सुद्धा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन झाल्याने शेतकरी व नागरिक उत्साहित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली.

उन्हामुळे पारा सुद्धा वाढला. दरम्यान पुढील सहा दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून हवामान विभागाने यलो अर्लट सुद्धा जारी केला आहे.

दामिनी ॲप डाऊनलोड करावे

जिल्ह्यात ४ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याच्या वेग ताशी ३० ते ४० किमी राहण्याची शक्यता आहे. वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा.

अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज चमकतांना मोबाईल उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत १२२ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ११२.३ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे. त्यानुसार २८ जूनपर्यंत अकोट तालुक्यात १४९.३, तेल्हारा ९३.८, बाळापूर १०८.८, पातूर १५५.६, अकोला १०८.२, बार्शीटाकळी १२३.५, मूर्तिजापूरमध्ये १२९.९ मिमी पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.