Akola Rain Update : तेल्हारा तालुक्यात विद्रुपा नदीला पूर; गावाचा संपर्क तुटला, गोर्धा-तळेगाव बाजार मार्ग बंद

तेल्हारा तालुक्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर
rain update vidrupa river floods in Telhara village network lost Gordha-Talegaon Bazar road is closed akola
rain update vidrupa river floods in Telhara village network lost Gordha-Talegaon Bazar road is closed akola Sakal
Updated on

तेल्हारा (जि.अकोला) : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील विद्रुपा नदीला पूर आला. या नदीवरील पुल खचल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गोर्धा- तळेगाव बाजार मार्ग बंद झाला आहे.

rain update vidrupa river floods in Telhara village network lost Gordha-Talegaon Bazar road is closed akola
Akola Rain Update : महान धरणात गत वर्षीच्या तुलनेत १२ टक्के जलसाठा कमी

तेल्हारा तालुक्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक गावांचा‌ संपर्क तुटला आहे. तळेगाव बाजार येथे जाणारे दोन्ही मार्गावरील पुल खचले. त्यामुळे गोर्धा- तळेगाव बाजार आणि अडगाव-तळेगाव हे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत.

rain update vidrupa river floods in Telhara village network lost Gordha-Talegaon Bazar road is closed akola
Nashik Rain Alert : जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आज जोरदार पावसाचा अंदाज

वरुड बु. येथे मुसळधार पावसाने गावात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पाथर्डी येथील शेतकरी अमोल कुकडे व सोनटक्के हे रात्री शेतात रखवाली करायला गेले होते. मात्र, रात्री पाऊस सुरू झाल्याने दोन्ही शेतकरी अडकले. ते रात्रीपासून झाडावर बसून आहेत.

पाथर्डी येथील ठाकुर नामक मामभाचे शेतात रखवाली करायला गेले होते. ट्रॅक्टर ट्रॉली नदीला आलेल्या पुरात वाहुन गेल्याची माहिती मिळत आहे. मात्र, शेतकरी अजुनही घरी पोहोचले नाहीत. प्रशासनाने मदत कार्य सुरू केले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक मदतीसाठी पोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.