Washim News : पंधरा दिवसांत निघाले रस्त्याचे डांबर; एमएसआरडीसीचे दुर्लक्ष

वर्दळीच्या रस्त्याची कंत्राटदारी सदोष: वाशीम ते पुसद व कारंजा महामार्गावर जाण्यासाठी पुसद नाका एकमेव पर्याय
rain update washim to pusad road Patholes in 15 days road construction msrdc
rain update washim to pusad road Patholes in 15 days road construction msrdcesakal
Updated on

वाशीम : तब्बल पाच वर्ष खड्ड्यात धक्के खाल्ल्यानंतर बनविलेला डांबरी रस्ता अवघ्या पंधराच दिवसांत खड्डेमय होत असल्याची किमया महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बनविलेल्या रस्त्यावर घडली आहे.

महामंडळाकडून पावसाचे कारण देत कंत्राटदाराला खड्डे बुजविण्याचे फर्मान सोडले तरी पंधरा दिवसांत नव्या रस्त्यावर खड्डे पडल्यास रस्त्याची गुणवत्ता कशी असेल लक्षात येते.

वाशीम ते पुसद व कारंजा महामार्गावर जाण्यासाठी पुसद नाका एकमेव पर्याय आहे. पाच वर्षांपासून रेल्वे उड्डाण पूलाचे काम सुरू असल्यापासून हा शंभर मिटरचा रस्ता जिवघेणा झाला होता. दोन ते अडीच फूट खड्ड्यातून नागरीकांना मार्गक्रमण करत त्रास सोसावा लागला.

या रस्त्यावर अनेक अपघात झाले. रस्ता बांधकामासाठी राजकीय व सामाजिक संघटनांकडून अनेक आंदोलने झाली. तेव्हा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला जाग येवून पंधरा दिवसापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले.

पाच वर्षाचा त्रास संपला या आनंदात नागरीक असताना या आनंदाचा अवसानघात झाला. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याला आता खड्डे पडत असल्याने या कामाची गुणवत्ता उजागर झाली आहे.

rain update washim to pusad road Patholes in 15 days road construction msrdc
Akola News : महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्‍याची शेतकऱ्यांची तक्रार

या कामाची किंमत तीस लाख असल्याची माहिती असून कंत्राटदार व रस्ते विकास महामंडळाच्या युतीतून अतिशय निकृष्ट काम झाल्याचा आरोप नागरीकांमधून केला जात आहे. या रस्त्यावर डांबराचे प्रमाण अतिशय अल्प आहे.

पावसाळा असल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात हा दावा रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सय्यद यांनी केला असला तरी पेरणी करण्यापुरता पाऊस झाला नसताना ही परिस्थिती आहे तर मुसळधार पाऊस झाल्यावर रस्ता राहणार कि जाणार याचे उत्तर रस्ते विकास महामंडळालाच द्यावे लागणार आहे. या रस्त्यावर डांबरीकरण करताना अंदाजपत्रकाला फटाके लावल्यानेच तीस लाखाचा व शंभर मीटरचा रस्ता पंधरा दिवसातच शहिद केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

rain update washim to pusad road Patholes in 15 days road construction msrdc
Washim : वाशीमची सूत्रे हालतात यवतमाळातून ; पालकमंत्र्यांचे जनसंपर्क कार्यालय झाले जिल्हा मुख्यालय

कामच निकृष्ट, रंगरंगोटीचा व्यर्थ अट्टाहास

पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या तीस लाखाच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असतील तर रस्त्याची गुणवत्ताच सदोष आहे. हे सर्वसामान्य माणसालाही कळते. कंत्राटदाराला याचा जाब विचारण्या ऐवजी पंधरा दिवसाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे फर्मान एमएसआरडीसीकडून दिले जात असेल तर ही बाब कंत्राटदाराला पाठिशी घालणारी आहे. मुळात बांधकामच निकृष्ट झाले तर वरवरची रंगोटीही किती दिवस टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर रस्त्याचे डांबरीकरण एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे. या रस्त्यावर डांबराचा एक कोट पडणार आहे. सध्या खड्डे पडले असतील तर कंत्राटदाराला दुरूस्त करण्यास सांगण्यात येईल.

- सय्यद एच. अली ,अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.