Monsoon Health News : संततधार पावसामुळे जलजन्य आजार बळावले; अशी घ्या काळजी, आरोग्य यंत्रणेचे आवाहन

Monsoon Health latest news | गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने दूषित आणि घाण पाणी साचून राहते. त्यामुळे कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ अशा जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका
rains diseases take precautions appeal of health department
rains diseases take precautions appeal of health departmentSakal
Updated on

अकोला : शहरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने दूषित आणि घाण पाणी साचून राहते. त्यामुळे कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ अशा जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, मच्छरांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.

जलजन्य आणि जीवाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावामुळे ताप येणे, डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी अशी कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांची लक्षणे आढळून येतात.

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना या आजारांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. टायफॉईड आजार साल्मोनेला एन्टरिका या जीवाणूमुळे होतो.

दूषित पाणी अथवा अन्नातून हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. आजाराची लागण झाल्यास ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, वेदना अशी लक्षणे दिसतात. ताप कमी होण्यासाठी १ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग उंदीर किंवा वन्यप्राण्यांच्या मूत्रामुळे होतो. त्यांचे मूत्र शेतातील पाणी, पुराचे पाणी किंवा पावसाचे पाणी दूषित करते व याद्वारे या रोगाचा प्रसार माणसांमध्ये होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर दिसून येतो.

पावसाळ्यात विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात पादत्राणे न घालता बाहेर जाणे किंवा चालणे टाळावे. पाऊस सुरू असल्यास किंवा पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असल्यास बूट व त्यापासून संरक्षणासाठी योग्य कपडे घालावे. विशेष करून आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी योग्य सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे.

rains diseases take precautions appeal of health department
Akola Rain News : दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम; उशिरा पेरण्या झालेल्या शेतांमध्ये डवरणे, फवारण्या रखडल्या

कोणती खबरदारी घ्यावी ?

  • बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

  • दूषित पाणी पिणे टाळावे.

  • घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी.

  • शौचालयातून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत.

  • गरज भासल्यास पाणी उकळून प्यावे.

पावसाळ्यात नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे कॉलरा, टायफॉईड सारखे जलजन्य आजार लहान मुलांवर व ज्येष्ठांवर आघात करतात. पावसाळ्यात घराच्या परिसरात स्वच्छता व लहान मुलांना खाण्याचे पदार्थ देताना काळजी घ्यावी.

- डॉ.गजानन कराळे, जनरल फिजीशियन, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.