मूर्तिजापूर - 'भारत माता की जय'च्या जयघोषात कतार देशाचा जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीचा विश्वविक्रम 'राजपथ इन्फ्राकॉन' कंपनीने आज दुपारी १२.२० वाजता मोडीत काढला व उद्या संध्याकाळी सात वाजता नवा विश्वविक्रम निर्माण करण्यासाठी कूच केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनीने एका विश्वविक्रमी उपक्रमाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचा सहा) वरील अमरावती जिल्ह्यातील लोणी येथून शुक्रवारी (ता.३) प्रारंभ केला आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम मंगळवार (ता.७) पर्यंत पूर्णत्वास जाईल व नवा विश्वविक्रम प्रस्थापीत होईल. यासंदर्भातील १० दिवसात २५..२७५ किलो मिटर अंतराच्या रस्तानिर्माण कार्याचा विक्रम कतार देशातील दोहा येथे झाल्याची 'गिनिज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद आहे. या विक्रमाची बरोबरी आज दुपारी १२.२० वाजता 'राजपथ इन्फ्राकॉन'ने केली व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला व उद्या संध्याकाळी १०८ तासात ४० किलोमिटर रस्तानिर्मिताचा नवा विश्वविक्रम प्रस्थापीत करण्यासाठी पुढील वाटचाल सुरू केली.
'राजपथ'चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या उपस्थितीत कतार मधील विक्रमाची बरोबरी करण्याचा क्षण सर्वांनी 'भारत माता की जय','जय शिवाजी जय भवानी,'जय महाराष्ट्र'च्या घोषणांच्या निनादात साजरा केला. या कामाचा दर्जा राखण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आली आहे. वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्त्याचा दर्जा ही प्रयोगशाळा तपासते. त्यानंतरच बिटूमिनस सह सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरल्या जाते.
हा धाडसी प्रयत्न 'गिनीज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड'च्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. कुठलीही त्रुटी नाही. आमची चार सदस्यीय चमु लक्ष ठेवून आहे.
- पुर्णिमा जाधव. सदस्य, गिनिज बुक आॕफ वर्ल्ड रेकॉर्ड चमु.
नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जात आहे. ७२८ मनुष्यबळ कार्यरत आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष आहे. प्रकल्प व्यवस्थापक, अभियंते, सर्वेक्षक, सर्व्हेअर अशा तज्ज्ञ चमुचे लक्ष आहे. माना कॅम्प येथील व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम मध्ये ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत आहे. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी तैनात आहेत.
सतत ११० तास रात्रंदिवस काम करून पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पातील कामाची गुणवत्ता निरंतर तपासली जात आहे. कामाचे मायक्रोप्लॕनिंग झाले असून आज विश्वविक्रमाची बारोबरी झाली. तो मोडीतही निघाला. शिवराज्याभिषेक दिनाच्या पर्वावर तो राष्ट्राला समर्पीत आहे. उद्या नवा विश्वविक्रम प्रस्थापीत होईल.
- जगदीश कदम, व्यवस्थापकीय संचालक, राजपथ इन्फ्राकॉन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.