वाशीम : वायर आणि प्लेट्सचे 'मिनी टॉवर', मोबाईल रेंजसाठी भन्नाट आयडिया

स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर
स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर
स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर sakal
Updated on

वाशीम : गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते उगीच नाही. असंख्य मानवी गरजातुनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत. अनेक शोध लावलेल्या आपल्या भारत देशातही काही टॅलेंटची कमी नाही. अगदी कार ते जेट इंजिन बनविणारे बरेच रॅंचो आपल्या अवती भोवती आपण पाहत असतो. मात्र, वाशीम जिल्ह्यातील पिंप्री अवगण या गावाने असाच एक भन्नाट शोध जगासमोर आणला. नावात अवगण असणाऱ्या पींप्रीच्या गुणी लोकांनी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणुन घराच्या छतावर मोबाईलचे टॉवरच उभारले आहेत. स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर आपल्याला पींप्री अवगण या गावात घरोघरी पाहायला मिळतात.

स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर
पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू, अजित पवारांकडून नवी नियमावली जाहीर

दरम्यान, कोरोना काळात ऑनलाईन वर्गासाठी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणुन मोबाईल नेटवर्कची रेंज वाढविण्यासाठी पिंप्री येथील संदीप अवगण यांनी शोध लावुन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गाच्या प्रश्नासोबतच गावकऱ्यांचा घराच्या छतावर जाऊन फोनवर बोलण्याचा त्रास मिटवला आहे. कनेक्शनला काही प्लेट्स असतात तसेच रेडियो फ्रिक्वेन्सी व्यवस्थित करण्यासाठी पुर्वी त्याचा ॲंटिना थोडा उंच धरल्यास हवे ते स्टेशन सुरळीतपणे चालते या पुर्वज्ञानातुन संदीप अवगण यांनी दोन स्टीलच्या प्लेट्स विरूध्द दिशेला लाकडी बांबूवर जोडल्या त्याला टीव्ही डिशची तार जोडून तारेचे एक टोक घरात सेट केले. आता हायस्पिड नेटवर्क आल्याने पिंप्री अवगणवासीयांच्या या देशी संशोधनाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()