Ranjit Patil : डॉ. रणजित पाटील यांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट,कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात भाजपातील इच्छुकांत खळबळ

Ranjit patil : कारंजा-मानोरा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या चार इच्छुकांमध्ये माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट निर्माण केला आहे, ज्यामुळे इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Ranjit Patil akola
Ranjit Patilsakal
Updated on

कारंजा : आगामी निवडणुकीसाठी कारंजा मानोरा मतदारसंघातून भाजपकडून चार जण दावेदारी करीत असताना अचानक माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे एन्ट्रीने मतदार संघात नवा ट्विस्ट पहायला मिळत असून इच्छुकात खळबळ उडाली आहे.

कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ महायुतीत कुणाला सुटणार, हे अद्यापही निश्चित नसले तरी ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला सुटेल असे सूत्र ठरले असल्याने हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. या मतदार संघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेंद्र पाटणी बाजीगर ठरले होते.

परंतू त्यांचे काही महिन्यांपूर्वी अल्प आजाराने निधन झाल्याने मुलगा ज्ञायक पाटणी यांनी मतदारांशी नाळ जुळवून ठेवली. तसेच ज्येष्ठ नेते नरेंद्र उर्फ जेठूसेठ गोलेच्छा, राजू पाटील राजे, डॉ. राजीव काळे यांनी जुन्या व नव्या फळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाने आमच्या तिघांपैकी कुणालाही उमेदवारी दिली तर भाजपचा गड कायम ठेऊ, अन्यथा पर्याय शोधू ,असे पक्षाला ठणकावून सांगितले.

त्यादृष्टीने राजु पाटील राजे व डॉ.राजीव काळे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. ॲड. ज्ञायक पाटणी, राजु पाटील राजे व डॉ. राजीव काळे तिघेही पक्षाकडे तिकीटासाठी दावेदारी करीत मतदार संघ पिंजून काढीत असतांना मध्येच अकोला रहिवासी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छांचे शहरात फ्लेक्स लागून जोरदार एन्ट्री झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यांच्या एन्ट्रीने कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे.

वेट ॲन्ड वॉचची भूमिका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. परंतू पक्षश्रेष्ठींनी अकोटमध्ये शक्य नसल्याने कारंजा-मानोरा मतदार संघात लक्ष घाला, असे सांगितले असल्याचे कळते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा कारंजा मानोरा मतदार संघात वळविल्याची चर्चा जनमानसात होत आहे. त्यांच्या अती जवळच्या व्यक्तीने सांगितले की राजकारण आहे वेळेवर काहीही होऊ शकते त्यामुळे वेट ॲन्ड वॉचची भूमिका पार पाडू या.

कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या मनात असेल व पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी दिली तर निश्चितच मैदानात उतरू. पक्षाकडे कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अंतीम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

- डॉ.रणजित पाटील, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.