Ration Distribute : एक लाख ३५ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप

गौरी-गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता.
ration distribute
ration distributesakal
Updated on

अकोला - गौरी-गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता. त्यानुसार गणपतींच्या आगमनाच्या एक दिवस आधीपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ९३१ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

एकूण तीन लाख २८७ लाभार्थ्यांच्या तुलनेत वाटपाची टक्केवारी ४५.२७ आहे. दरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधा रेशन दुकानातून न्यावा, असे आवाहन पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखव व एक लीटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच ‘आनंदाचा शिधा’ गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सदर आनंदाचा शिधा एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येत आहे. पात्र शिधापत्रिकाधारकाला ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरण करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख २८७ रेशनकार्डधारक आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरले असून १८ सप्टेंबर पर्यंत एक लाख ३५ हजार ९३१ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

जिल्ह्यात असे धान्य किट्‍स वाटप

तालुका - वाटप

अकोला- १८७९०

अकोला शहर - ११०११

अकोट - २२३४५

बाळापूर - १५२६१

बार्शीटाकळी - २०८८५

मूर्तिजापूर - १८३९५

पातूर - १३४२९

तेल्हारा - १५८१५

एकूण - १३५९३१

जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थ्यांनी रेशन दुकानात जाऊन शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा घ्यावा. यासंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास पुरवठा विभागासोबत संपर्क साधावा.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()