सिंदखेड राजा - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ता. ५ सप्टेंबर पासून सिंदखेड राजात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्या संदर्भात ता. ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे.