अकोला : येथील आळशी प्लॉट येथील दरोड्याप्रकरणात पोलिसांना आरोपीचा शोध लावण्यात यश आले. आरोपीचा शोध लावण्याकामी खदान पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे. हा दरोडा जुन्या नोकरानेच बदल्याच्या भावनेतून केला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
आळशी प्लॉट मधील उद्योजक नवलकीशोर अमृतलाल केडीया यांच्या निवासस्थानी २७ जूनच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. पोलिस गणवेशात आल्याने व्यक्तीने ते एका मुलीचा शोध घेत असून ती घरात असल्याची बतावणी केली होती. पोलीस गणवेशातील व्यक्तीसोबत असलेला इसम हा दारुचे नशेत आहे असे लक्षात येताच फिर्यादीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्या दोन्ही व्यक्ती व त्यांच्या मागेच अजुन दोन व्यक्ती असे चार व्यक्तिनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात प्रवेश करुन केडिया व त्यांची मोलकरीन यांचेवर बंदुक सदृश्य शस्त्र व चाकु रोखून फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन व घरातील दोन मोबाईल तसेच मोलकरीनच्या कानातील टॉप्स जबरीने काढुन घेतले व कपाटातील पाकीट मधील नगदी रुपये असा एकुण ५७ हजाराचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला, अशा तक्रारीवरुन अज्ञात चार इंसमांविरुध्द पोलीस स्टेशन खदान येथे ४५२, ३९२,३९७ ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पुष्पराज शाहा रा. सुरत, गुजरात (केडीया यांचा तत्कालीन ऑफीस मॅनेजर) हे नाव संशयीत म्हणून समोर आले.
यावरुन तात्काळ सुरत येथे एक तपास पथक रवाना करण्यात आली पुष्पराज शाहा याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच हा गुन्ह्याचा कट रचला असुन त्यामध्ये त्याचा मामा सचिन शाहा रा. नाशिक व ईतर चार साथिदार यांचा सहभाग असल्याचे समोर आले. सचिन शाहा व विनायक देवरे यांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपी पुष्पराज शाहा याने माहीती दिली की, मी साथिदारांना सांगितले होते की, केडीया यांचे घरी चोरी केली तर आपल्याला वीस लाख रुपये नगदी किंवा खंडनी स्वरुपात मिळतील वरुन सर्व तयार झाले पुष्पराज च्या बोलावण्यावरुन सचिन शाहा आपले ईतर चार साथिदारासह सुरत येथे गेला व त्या ठिकाणी केडीया यांचे घरी जबरी चोरी करण्याचा कट रचला. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून फरार तीन आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले. ही कारवाई अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग सतिश कुळकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली खदानचे ठाणेदार गजानन धंदर, सहा.पोलीस निरीक्षक निलेश करंदीकर, उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.