RTE Admission 2024 : ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ; आता ८ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील निवड यादीत आलेल्या १९१८ विद्यार्थ्यांपैकी १३१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
rte admission 2024-25 extension till 8 august education akola student
rte admission 2024-25 extension till 8 august education akola studentSakal
Updated on

अकोला : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील निवड यादीत आलेल्या १९१८ विद्यार्थ्यांपैकी १३१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ६०६ जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत. निवड यादीतून प्रवेशाची मुदत ५ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली होती.

त्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ८ ऑगस्टपर्यंत पहिल्या यादीनुसार पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश घेता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीईच्या पहिल्या निवड यादीनुसार एक हजार १३१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अर्ज करण्यात पालकांना अनेक अडचणी आल्या. तसेच यंदा शालेय शिक्षण विभागाने पूर्वीच्या ‘आरटीई’च्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले होते.

rte admission 2024-25 extension till 8 august education akola student
RTE Admission : ‘आरटीई’तून ८०१ प्रवेश निश्चित; प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

पण, या बदलाला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याठिकाणी अंतरिम स्थगिती मिळाल्यावर शालेय शिक्षण विभागाने तो बदल तात्पुरता थांबवून पालकांकडून दुसऱ्यांदा अर्ज भरून घेतले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने हा बदल रद्द ठरविल्याने विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश देण्यात येत आहेत.

सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. परंतू, बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने पुन्हा मुदत ५ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, पावसामुळे बऱ्याच भागांमध्ये पुरपरिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन शिक्षण संचालयाने पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

rte admission 2024-25 extension till 8 august education akola student
RTE Admission : आरटीईअंतर्गत 832 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित; धुळे- नंदुरबारची स्थिती

मुदतवाढ मिळाल्यामुळे पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी प्रवेशासाठी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पालकांनी तालुका स्तरावर अर्जांची पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रतीक्षा यादीचे मेसेज जाणार

निवड यादीनुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज पडताडी करण्यासाठी मेसेज पाठविण्यात आले होते. आता पहिल्या फेरीची मुदत ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठविण्यात येतील. प्रतीक्षा यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन प्रतीक्षा यादी पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

rte admission 2024-25 extension till 8 august education akola student
Akola Corona Update : कोरोनाच्या एन्ट्रीमुळे अकोल्यातही यंत्रणा अलर्ट; लक्षणे आढळल्यास उपचार घेण्याचे आवाहन

पालकांना दिलासा

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देवूनही काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले नव्हते. त्यामुळे मुदतवाढ न मिळाल्यास पहिल्या यादीतील नावे बाद होणार होती. मात्र, ५ ऑगस्टरोजी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना आता दिलासा मिळाला आहे. निवड यादीतील प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने आता प्रतीक्षा यादीचे प्रवेश ८ ऑगस्ट नंतर होतील.

प्रवेश प्रक्रिया दृष्टीक्षेपात

  • आरटीईच्या शाळा - १९७

  • एकूण जागा - २०१४

  • प्रवेश पात्र विद्यार्थी - १९१८

  • प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - १३१२

  • प्रवेशासाठी शिल्लक जागा - ६०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.