Post Office : खबर देणारी पोस्टाची पेटीच बेखबर; सेवा क्षेत्रात भरीव योगदान

टपाल अन् आंतरदेशीय पत्रांची लालपेटीला प्रतीक्षा; पोस्ट पेमंेट बँक पोहोचली घराघरांत
Post Office
Post OfficeSakal
Updated on

नांदुरा : ग्रामीण भागात टपाल गाडी येऊन गेल्यावर गल्लीतले लोक पोस्टमन येण्याची वाट पाहते. पोस्टमनच्या हाती पत्र आणि आंतरदेशीय कार्डाचा एवढा गठ्ठा असायचा की तो त्याला हातात धरणे कठीण जात असल्यामुळे थैलीत घालून न्यावा लागत असे.

कधी पायी, तर कधी सायकलवर गावभर पत्रांचा बटवडा करताना पोस्टमन घामाघूम होण्याचा जमाना गेला. आता संपर्क, संदेशाची साधने बदलली. टपालाने भरभरून वाहणारी आणि सगळ्या गावांची खबर वाटणारी लालपेटी आता स्वतःच टपालाची वाट पाहत अडगळीत बेखबर झाल्याचे गावोगावीचे चित्र आहे.

आजकाल आंतरदेशीय पत्र, पाकीट अनेक ठिकाणी मिळत नाही आणि पोस्ट कार्डही घेणारेही दिसत नाहीत. आंतरदेशीय पत्राचा १९७० ते १९९० पर्यंत खूप वापर होता. चार पाच दशकांतील कामे पूर्ण बंद झाली असून, आता पोस्टमास्तर आणि पोस्टमन दुसरीच काम करतात. पोस्ट आता बँक बनत चालले आहे.

पोस्टातून वार्षिक भरणा केलेले साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि काही शासकीय कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकांचे चेकबुक, ड्रायव्हिंग लायसन्स याशिवाय दुसरे काही येत नाही. त्यामुळे पत्रपेट्या ओस पडल्या आहेत.

पोस्टाची सेवा क्षेत्रात एन्ट्री

भारतीय पोस्ट आधुनिकतेचा मंत्र जपत कात टाकली आहे. पोस्टाने टपाल कामांव्यतिरिक्त बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि आता तर आधार कार्ड दुरुस्तीचे कामही सरकारकडून मिळवले आहे. त्यामुळे टपाल कार्यालय देशातील सेवा क्षेत्रात सरकारची एजन्सी म्हणून भरीव योगदान देत आहे.

नवीन उत्पादने जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी टपाल खात्याने तंत्रज्ञानाची कास धरली आहे. टपाल सेवे व्यतिरिक्त पोस्ट कार्यालये बचत योजना ही चालवते आणि त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. एवढेच नाही तर टपाल जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा यासह इतर ही अनेक सेवा देत असून इंडियन पोस्ट पेमेंट बँक घराघरात पोहचली आहे. आता आयपीपीबी या बँकेच्या माध्यमातून देशातील आर्थिक नाड्या मजबूत करण्याचे काम पोस्ट ऑफिस करत आहे.

Post Office
Akola Car Accident : कार हॉटेलात घुसली अन् पाणी भरत असलेल्या कामगाराने गमावला जीव

ओलावाही संपला

पोस्ट कार्डचा जमाना जुना झाल्याने पोस्ट कार्डवर पत्राने अर्धी भेट होते, असे लिहिण्याची पद्धत होती. पत्र लिहिणारा आणि ज्याला लिहिले तो वाचणारा यांच्यातला मायेचा ओलावा आज मोबाइल मधल्या संदेशाने मिळणे तसे कठीणच...!

नांदुरा तालुक्यातील अनेक गावांत लालपेटी कुठे आहे? हे गावातील नागरिकांनाही माहीत नसल्याचे आढळले. १५ पैशाला विक्री होणारे पोस्ट कार्ड कोणी घेणारेच उरले नसल्याने पोस्टाची लालपेटी अडगळीत पडली आहे. रोज गावभरातील अनेकांची खबर देणारी पेटी आज स्वतःच बेखबर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.