अकोट : अशा सर्व संतांच्या माहेर असणाऱ्या पंढरपूर वारीकरिता सर्व संतांप्रमाणेच सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांचे ता. १८ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ, मृदंगाच्या गजरात भक्तीमय प्रस्थान संपन्न झाले.
आमुची मिरासी पंढरी ।
आमुचे घर भीमातीरी ।।
पांडुरंग आमुचा पिता ।
रखुमाई आमुची माता ।।
दरम्यान पहाटे श्रींचा अभिषेक संपन्न होऊन सकाळी प्रस्थानाचे कीर्तन, श्रींच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक, फराळ महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा भव्य दिव्य पालखी सोहळा रथयात्रा निघाली.
पालखी मार्गाने ज्ञानोबा तुकाराम, ओम वासुदेव नमो नमः तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजनानंदात पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकोटवासियांनी ठिकठिकाणी सडा संमार्जन, रांगोळ्या, पुष्पवृष्टी करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले.
हरिनामाच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली होती. पताकधारी दिंडीच्या अग्रभागी असणारा देखणा अश्व आणि त्यावर असलेली श्रींची प्रतिमा सर्व भाविकांची लक्षवेधी ठरली. पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन संपन्न झाले.
पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजुरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, सुनंदा आमले, अशोकराव पाचडे, जयदीप सोनखासकर, गजाननराव चोपडे, नंदकिशोर हिंगणकर, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजाननराव दुधाट, पुरुषोत्तम मोहोकार
यांसह दिंडी व्यवस्थापक अंबादास महाराज मानकर, विष्णू महाराज गावंडे, राम महाराज गाढे, सागर महाराज परिहार, तेजराव महाराज म्हसाये, बालाजी महाराज तिडके, रथसारथी मदन महाराज मोहोकार, बाळकृष्ण आमले,
प्रा. साहेबराव मंगळे, बाळकृष्ण वाकोडे, अमोल मानकर, दिलीप कुलट, महादेवराव बोरोकार, श्रीराम कोरडे, ज्ञानेश्वर नराजे, नागोराव बायस्कार यांसह असंख्य महिला-पुरुष भक्तमंडळी उपस्थित होती.
श्रींच्या पालखी सोहळ्याचे क्षेत्र श्रद्धासागर येथे वारकऱ्यांना फराळ सेवा देऊन त्याचप्रमाणे पालखी मार्गाने कालवाडी फाटा,
श्री शिवाजी कॉलेज, उज्ज्वलनगर, सरस्वतीनगर, शनिवारा, कालंका चौक, नरसिंह मंदिर प्रांगण, श्रींचे निवासस्थान, जवाहर रोड आदी ठिकाणी चहा सर्व फराळ, फळ आधी अर्पण करून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
अकोट ते पंढरपूर पालखी मार्गाने वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता म्हणून वारकऱ्यांसाठी नंदू हलवणे यांच्यातर्फे रुग्णवाहिका सेवा देण्यात आली.
तसेच पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था म्हणून महादेवराव ठाकरे यांचे वतीने पाण्याचा टँकर, तर वारकऱ्यांचे सर्व साहित्य वाहून नेण्याकरिता अशोकराव उन्हाळे, शेगाव यांचे तर्फे ट्रक सेवा श्रींचरणी अर्पण करण्यात आली.
श्री क्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पदयात्रा करणाऱ्या सर्व वारकऱ्यांची श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट द्वारा विमा कवच देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.