Akola : सराव येथील ग्रामसेविका निलंबित; दूषित पाणीपुरवठा झाल्याने गावात साथरोगाची लागण

बार्शीटाकळी तालुक्यातील सराव गावात ता. १० जुलैपासून शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या दूषित पाण्याचा वापर केल्याने ग्रामस्थांना मळमळ, उलट्या, अतिसार, डायरियाची लागण होऊन साथ रोगाचा उद्रेक झाला होता.
sarav village gram sevika suspended Due to contaminated water supply health issue
sarav village gram sevika suspended Due to contaminated water supply health issueSakal
Updated on

बार्शीटाकळी : तालुक्यातील सराव गावात साथ रोग पसरल्याने ता. १३ जुलै रोजी जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी बी विष्णवी यांनी सराव गावाला भेट देत रुग्णांची विचारपुस करून पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली. यावेळी दूषित पाणी आढळून आल्याने सराव गावाच्या ग्रामसेविका माधुरी दाभेकर यांना निलंबित, तर ग्रामपंचायतचे जलसुरक्षा कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बार्शीटाकळी तालुक्यातील सराव गावात ता. १० जुलैपासून शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या दूषित पाण्याचा वापर केल्याने ग्रामस्थांना मळमळ, उलट्या, अतिसार, डायरियाची लागण होऊन साथ रोगाचा उद्रेक झाला होता.

याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळाल्याने ता. १२ जुलै रोजी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावाचे सर्वेक्षण करून दोन दिवस अहोरात्र प्रयत्न करीत साथ रोग अटोक्यात आणले. सरावमध्ये २१२ घरे असून, लोकसंख्या ८oo आहे. यातील ३० रुग्णांना कमी लक्षणे आढळून आले. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी व बार्शीटाकळी तालुक्यातील येथील संपूर्ण डॉक्टर, आरोग्य यंत्रणा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक,

आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशासेविका, गटप्रवर्तक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, असे संपूर्ण आरोग्य यंत्रणा क्षणात युद्धपातळीवर आरोग्य सेवा देत सराव गावात तैनात करून साथ आटोक्यात आणली व रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत चांगली आहे.

संपूर्ण गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले व पूर्ण गाव पिंजून काढून रुग्ण आटोक्यात आले. तब्बल २५ पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले व एकूण ३५ ओटी टेस्ट तीन तासात करण्यात आल्या. ग्रामपंचायत येथील पाणीपुरवठा सुरळीत व सुस्थितीत करून संपूर्ण गावात निर्जंतुक पाण्याची कॅन वाटप करण्यात आल्या आहेत. रुग्णांना अतिशय लक्षवेध सर्वेक्षण करून औषधोपचार करण्यात आला.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, नायब तहसीलदार हर्षदा काकड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे, गटविकास अधिकारी अशोक बांगर, विजय जाधव,

तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या, विस्तार अधिकारी रमेश चव्हाण, शरद ठाकूर, वैद्यकीय अधिकारी सचिन राठोड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रुग्णांची तपासणी करून विलगीकरण कक्षात रुग्णांना चार तास निरीक्षणात ठेवले. यासाठी सरपंच वसंतराव जाधव परिश्रम करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.