अकोला : ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट अकृषक करण्यासाठी प्रस्ताव दिल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) लाचेची मागणी करणाऱ्या अकोट तालुक्यातील टाकळी खुर्दच्या सरपंच त्यांच्या वडिलांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या. एनओसीसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती चाळीस हजार स्वीकारण्याचे कबूल केल्यानंतर वडिलांमार्फत १० हजारांची रक्कम स्विकारल्याची माहिती अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.