Akola : पुलावरील पाण्यातून पालकांचा जीवघेणा प्रवास

पुलाच्या उंचीकडे संबंधितांचे दुर्लक्ष पालकांसह चिमुकल्याचेही जीव धोक्यात
Akola
Akola sakal
Updated on

तरोडा : आपल्या पाल्याला लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, त्यांचे आयुष्य आनंदी राहावे यासाठी पालक जीवाचे रान करतात. जेमतेम शाळेत पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांना शाळेत पोहचवण्यासाठी गावातील नदीवरील पुलावरून जाणाऱ्या पाण्यातून पालकांना गुडक्या इतक्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र तरोडापासून जवळच असलेल्या पातोंडा गावात दिसून आले.

अकोट तालुक्यातील पातोंडा ते जवळखेड रस्त्यावरील नदीवर बांधलेल्या पुलाची उंची कमी असल्याने, तसेच नवीन पुलाचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याने नेहमीच पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

पुलावरील पाण्यामुळे गावातील गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेता येत नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही, मजुरांनाही शेतात व इतर काम करण्यासाठी बाहेर पडता येत नाही, काही शासकीय व इतर कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांना जाणे कठिण होत आहे. गावातील शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्याकरिता खासगी वाहनाचा वापर पालकांना करावा लागतो. परंतु, पावसाळ्यात नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणतेही प्रवासी वाहन पूल ओलांडण्याचे धाडस करत नाही. परंतु, आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ह्रदयावर दगड ठेवून गुडघ्या एवढ्या पाण्यातून काकेत घेऊन पाल्यांना वाहनापर्यंत पोहचवण्याचे जोखिम पातोंडा गावातील पालकांकडून केल्या जात असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

याठिकाणी एखादी मोठी घटना घडल्यावरच संबंधितांना जाग येणार का?, असा प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अकोट तालुक्यातील बऱ्यापैकी वस्ती असलेले पातोंडा हे एक गाव असून, गाव विकासापासून कोसो दूर आहे. अनेकदा मुख्य बाजारपेठेची गावचा संपर्क तुटतो, गावाला जोडणारे सर्वच रस्ते अतिशय खराब असून, रेल-पातोंडा रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत, त्याचप्रमाणे पातोंडा-जवळखेड या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत आणि बांधकाम चालू असलेल्या पुलाची उंची कमी असून, पूल हा वेगळ्याच ठिकाणी बांधल्या जात असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. याविषयी ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपले गऱ्हाणे मांडले. परंतु, याविषयी संबंधितांकडून योग्य उपायोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

पातोंडा येथील तालुका किंवा जिल्ह्याच्या, तसेच इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचे गावचा संपर्क तुटला असता, अनेक वेळा गावाबहेर जाता येत नाही, त्यामुळे अनेकदा त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तरी संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी उंच पूल बांधावा आणि रस्त्याचीही दुरुस्ती करावी. पावसाळ्यात अनेकदा गावचा संपर्क तुटतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी.

- दिलीप भोंडे, ग्रामस्थ, पातोंडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.