अकोला मनपा क्षेत्रात सात हजारांवर दिव्यांग

महानगरपलिकेचे दिव्‍यांग सर्व्‍हेक्षणाचे काम पूर्ण
Seven thousand cripples in Akola Municipal Corporation area
Seven thousand cripples in Akola Municipal Corporation areasakal
Updated on

अकोला - महानगरपालिका अंतर्गत मोबाईल ॲपव्‍दारे सुरू करण्‍यात आलेले दिव्‍यांग सर्व्‍हेक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. शहरात सात हजारांवर दिव्यांगांची नोंद घेण्यात आली आहे. सर्व्‍हेक्षणा दरम्‍यान शहरातील एखाद्या दिव्‍यांग व्‍यक्तीचे सर्व्‍हेक्षण राहिले असल्‍यास त्‍यांना समक्ष दिव्‍यांग कक्ष, महानगरपालिका अकोला कार्यालयाशी संपर्क साधून नोंद करता येणार आहे.

एप्रिल २०२२ पासून महानगरपालिकेच्‍या वतीने अकोला शहरात घरोघरी जाऊन प्रगणकाच्‍या माध्‍यमातून मोबाईल ॲपव्‍दारे सर्व्‍हेक्षण करण्‍यात आले. शहरातील सुमारे एक लक्ष निवासी कुटुंबांना यादरम्‍यान भेटी देण्‍यात आल्‍या व त्‍या कुटुबांची मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद घेण्‍यात आली. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत शहरात सात हजार पेक्षा अधिक दिव्‍यांग व्‍यक्ती आढळून आल्‍या आहेत.

सर्व्‍हेक्षण करताना कुटुंब बाहेर गावी गेले असेल, अज्ञानामुळे माहिती दिली नसेल किंवा अनावधानाने प्रगणकाकडून घर सुटले असेल तर अशा दिव्‍यांग कुटुंबाची माहिती संबंधित दिव्‍यांग व्‍यक्तीने किंवा त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांनी समक्ष दिव्‍यांग कक्ष, अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय येथे आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह येऊन माहिती देऊन नोंद करून घ्‍यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.