सावधान! विषारी साप पडले बाहेर; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज

सावधान! विषारी साप पडले बाहेर; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज
Updated on

अकोला : सध्या खरिपातील पीक वाढीचा काळ आहे. निंदणं, डवरणी, फवारणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. मात्र, याच दिवसांमध्ये शेतात मोठ्याप्रमाणात विषारी साप बाहेर पडतात आणि सर्प दंशाच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी शेतात काम करताना योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्प मित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी केले आहे. (Snake-Bite-Venomous-snake-Farmers-need-to-be-careful-Farmers-News-nad86)

यावर्षी जिल्ह्यात काही भागांत योग्यवेळी पेरणी झालेले पीक डौलदार असून, काही भागात उशिरा पेरणी झाल्याने पीक वाढीचा काळ पाहायला मिळतो आहे. त्यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक पेरणी असून, पीक दाट होत आहे. परंतु, पावसामुळे वातावरणात बदल होत असल्याने, आर्द्रता वाढल्याने आणि बिळामध्ये पाणी घुसल्याने विषारी साप या दिवसांत बाहेर पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने घोणस व नाग या विषारी सापांच्या प्रजाती प्रामुख्याने दिसून येतात.

सावधान! विषारी साप पडले बाहेर; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

घोणस सापाचा रंग जमिनीवर व पिकात लवकर ओळखू येत नाही. त्यामुळे शेतात काम करताना घोणस दंशाच्या घटना दरवर्षी सर्वाधिक घडतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या मृत्यूच्याही घटना अधिक असतात. शेतात काम करताना शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला सर्पतज्ज्ञांनी दिला आहे.

सावधगिरी हीच सर्प दंशापासून सुरक्षा

घोणस (परळ) सापाने दंश केल्यास तत्काळ लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, दंशाच्या ठिकाणी जळजळ होते. निरखून पाहिल्यास दोन दातांचे बारीक निशाण उमटलेले आढळते. अर्धा ते एक तासानंतर लक्षणे दिसून येऊ लागतात. मळमळ, सुजणं आदी परिणाम दिसतात. त्यामुळे दंशाची चाहूल लागताच किंवा व्यक्तीने शंका व्यक्त केल्यास विनाविलंब दवाखान्यात न्यावे. नागाने दंश केल्यास दहा ते १५ मिनटांतच मळमळ, उलटी, लाळ गळणे, फेस येणे, तोल जाणे, बोलताना अडखळणे अशी लक्षणे दिसून येतात. दोन्ही विषारी साप असल्याने उपचारासाठी उशीर झाल्यास मृत्यू संभावतो. परंतु, वेळीच उपचार केल्यास नुकसान टाळता येते.

सावधान! विषारी साप पडले बाहेर; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज
उघडं दार देवा आता... मागणी नसल्याने फुलांचा सुगंध शेतातच कोंडला
या दिवसांत सर्वच जातीचे साप बाहेर पडतात. शेतामध्ये प्रामुख्याने घोणस (परळ) साप या दिवसांत बाहेर पडतात. तो सुस्त असतो व जमिनीवर त्यांचा रंग सहजासहजी ओळखू येत नाही. सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी व चिखल असल्याने साप कोरडी जागा शोधतात. सर्प दंशाची चाहूल लागल्यास किंवा शंका आल्यास तत्काळ दवाखान्यात दाखवावे. बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक, घरगुती उपचाराला बळी पडू नये. घोरपड हा प्राणी घोणस व इतरही सापांना शोधून भक्ष्य बनविते. मात्र, घोरपडीची शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने रानावनातही घोरपडीची संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार थांबविणे अत्यावश्यक आहे.
- बाळ काळणे, सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक, वनविभाग अकोला

(Snake-Bite-Venomous-snake-Farmers-need-to-be-careful-Farmers-News-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.