इन्स्टाग्रामवर तरुणाने केला विवाह! विनयभंगासह विविध गुन्हे दाखल

crime
crimee sakal
Updated on

बुलडाणा : आधुनिकतेकडे पाऊल ठेवत असताना अनेक विकृत कुपत्याही समोर येत आहेत. एका तरुणाने चक्क इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून लग्न केल्याचे सांगत सोबतचे फोटो सुद्धा अपलोड केले आहे. चिखली तालुक्यातील उंद्री या छोट्याशा गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी धीरज सुभाष इंगळे (रा. घाणेगाव) या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण भागातही आता सोशल मीडियाचे जाळे पसरत आहे. यातून युवक प्रेमासाठी काहीपण असे प्रकार करीत आहे. तरुणाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून १९ वर्षीय युवतीसोबतचे पती-पत्नी असल्याचे फोटो टाकून बदनामी केली. याविरोधात अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर सदर तरुणाने मुलीच्या घरासमोर येऊन तिचा हात पकडत विनयभंगसुद्धा केला.

crime
‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट

याप्रकरणी पोलिसांनी धीरज सुभाष इंगळे (रा. घाणेगाव) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला मुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणून तरणीसोबत जवळीक साधण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होता. तिला न विचारता इन्स्टाग्रामवर खातेही उघडले होते. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.

ग्रामीण भागात सोशल मीडियावर काय चांगले आणि काय वाईट याबाबत पूर्ती कल्पना नाही. त्यामुळे गुन्हेगारी स्वरुपासाठी सर्रास वापर होत आहे. स्मार्ट फोन नसलेल्या व्यक्तींच्या नावेही त्यांचा मोबाईलवरील ओटीपी घेऊन खाते बनवीत त्रास देण्याचे प्रकार वाढले आहे. याबाबत पालकांनी जागृक राहत मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- नागेशकुमार चतरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमडापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.