SSC Exam Result : पेंटरच्या लाडक्या कन्येने मिळविले ९२ टक्के गुण

हलाखीच्या परिस्थितीवर ‘स्नेहल’ने केली हिंमतीने मात.
Snehal Tayade
Snehal Tayadesakal
Updated on

अकोला - खासगी मध्ये बिल्डिंग पेंटिंगचे काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत स्नेहल अमोल तायडे या मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयातील विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. घरच्या हलाखीच्या परिस्थितीनंतर सुद्धा हार न मानता स्नेहलने मिळवलेल्या आपल्या यशाचे श्रेय वडिल, आई, शिक्षक व नातेवाईकांना दिले आहे.

वडिलांचे मेहनतीचे काम, घरची हलाखीची परिस्थिती व अपुऱ्या सुविधा असल्यानंतर सुद्धा जुने शहरातील पंचमुखी चौक परिसरातील रहिवाशी स्नेहल अमोल तायडे या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत. स्नेहलचे वडिल अमोल तायडे हे बिल्डिंग पेंटिंगचे काम करतात.

मोजके काम आणि मोजकेच उत्पन्न असल्याने तायडे कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. परंतु आपल्या परस्थितीची जाण ठेवत अमोल तायडे यांच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत मेहनतीच्या जोरावर अपुऱ्या सुविधांमध्ये सुद्धा सुविधा संपन्न विद्यार्थीनीना लाजवेल असे गुण मिळवले आहेत.

स्नेहल या विद्यार्थीनीने २०२३ मध्ये सायन्स मॉडेल मध्ये दुसरा क्रमांक पटविला होता. स्नेहलाला भविष्यमध्ये सीए व्हायचे असून त्यासाठी तिने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

बहिणीच्या पावलावर ठेवले पाऊल

स्नेहलची मोठी बहिण श्रृती तायडे हीने २०२३ मध्ये दहावीच्या परीक्षेत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत ९० टक्के गुण मिळविले होते. मोठ्‍या बहिणीची प्रेरणा व अभ्यासात गुरूजणांचे मार्गदर्शन, वडिलांचे कष्ट बघत स्नेहलने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळावे. यासाठी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर दिला. दररोज पाठांतर, अभ्यासाचे नियोजन व लेखन सरावाच्या जोरावर तिने गुण मिळविल्याचा माहिती दिली.

वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचे ध्येय

स्नेहलचे वडिल अंगमेहनतीचे काम करतात. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम आहे. अमोल तायडे यांच्याकडे स्वतःचे घर नसून ते भाड्याने राहतात. वडिलांची व कुटुंबाची हलाखीच्या परिस्थिती लक्षात घेवून स्नेहल व तिच्या बहिणीने वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी मेहनत व कष्ठ करण्याचा निश्चय दोन्ही बहिणींनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.