Chess Tournament 2024 : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेची निवड चाचणी अकोल्यात

प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्तपणे आयोजित ही निवड चाचणी दि. २० व २१ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड अकोला येथे होणार आहे.
Chess Tournament 2024
Chess Tournament 2024 Sakal
Updated on

Akola News : राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच्या निवड चाचणीचे अकोल्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित अकोला महानगर डिस्टीक्ट चेस असो. व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्तपणे आयोजित ही निवड चाचणी दि. २० व २१ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड अकोला येथे होणार आहे.

या चाचणीत मुलामुलीसाठी ७, ९, ११, १३, १५, १९ असा वयोगट ठेवण्यात आला आहे. २० जुलै रोजी ७, ११, १५ व १९ वर्षा आतील गटातील स्पर्धा होऊन दि.२१ जुलै रोजी ९, १३ व खुल्या गटातील स्पर्धा होणार आहेत.

यामध्ये ७, ९, ११, १३ वर्षाआतील वयोगटात प्रथम दोन मुलामुलीची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार असुन १५ व १९ वर्षा आतील गटात व खुल्या गटातील प्रथम चार मुला मुलीची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा केवळ अकोला जिल्हातील खेळाडुंसाठी असून, यात सात वर्षाआतील गटात १ जानेवारी २०१७ नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकतात. नऊ वर्षांआतील गटात १ जानेवारी २०१५ च्या नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकतात तर, ११ वर्षाआतील गटात १ जानेवारी २०१३ नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकणार आहेत. १३ वर्षाआतील गटात १ जानेवारी २०११ नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकतात.

१५ वर्षाआतील गटात १ जानेवारी २००९ च्या नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकतात तर, १९ वर्षा आतील गटात १ जानेवारी २००५ च्या नंतर जन्मलेले खेळाडु खेळु शकतात. या स्पर्धेसाठी एमसीए नोंदणी असणे आवश्यक असून, खेळाडूंनी वयाचा पुरावा आणणे आवश्यक आहे.

Chess Tournament 2024
Akola Crime : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंतासह दोघांनी थकीत पगार काढण्याकरिता महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

१८ जुलै अंतिम तारिख

नाव नोंदविण्याची अंतिम तारीख१८ जुलै २०२४ आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्पर्धकांनी अकोला महानगर डिस्टीक्ट चेस असोसिएशनचे सचिव जितेंद्र अग्रवाल यांच्याशी अथवा संदीप पुडंकर यांच्याशी संपर्क करून या स्पर्धेत खेळाडुनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभात क्रिडस स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, संदीप पुंडकर, जितेंद्र अग्रवाल यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com