अकोला : विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १०) अकोला-बुलढाणा-वाशीम जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशीरा सर्व सील केलेल्या मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालायतील स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यासोबत स्ट्रॉंगरूमला सील करण्यात आले. दरम्यान सदर स्ट्रॉंगरूमला सशस्त्र पोलिस जनाव पहारा देत असून मतमोजणी व स्ट्रॉंगरूममध्ये सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासोबत मतमोजणीचे टेबल सुद्धा सज्जा ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी मंगळवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता सुरू होणार असली तरी दोन्ही उमेदवार व त्यांचे समर्थक आपल्याच विजयाचा दावा करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधान परिषद अकोला, वाशीम, बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १०) डिसेंबर रोजी तिन्ही जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रांवर मतदान करण्यात आले. निवडणुकीत ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी मतदान केले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्व २२ मतदान केंद्रावरील मतपेट्या पोलिस संरक्षणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आणण्यात आल्या. या ठिकाणी नियोजन भावनांमध्ये सर्व मतपेट्या रांगेत ठेवण्यात आल्या. त्यानंतर मतपेट्या पोलिस संरक्षणासह व्हिडीओ कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांच्यासह भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थित स्ट्रॅंगरूमला सील करण्यात आले. दरम्यान आता मंगळवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता स्ट्रॉगरूम मधील मतपेट्या काढून मतमोजणी करण्यात येईल. सदर स्ट्रॉंगरूमला सशस्त्र पोलिसांमार्फत खडा पहारा देण्यात येत आहेत. याठिकाणी सकाळी व रात्री पोलिस कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे.
मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यकांची नियुक्ती
जिल्हाधिकारी कार्यालयालीत स्ट्रॉंगरूमला लागूनच मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच टेबल सज्ज ठेवण्यात आले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांना सहाय्य करण्यासाठीई प्रत्येक टेबलवर एक अव्वल कारकून व एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच राखीव मतमोजणी अधिकारी, कर्मचारी सुद्धा निश्चित करण्यात आले आहेत.
सकाळी १० पर्यंत संपूर्ण निकाल
आयोगाच्या सूचनेनुसार सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी ५ टेबल निश्चित करण्यात आल्याने सकाळी १० वाजेपर्यंतच निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अकोला निमा अरोरा जाहीर करतील.
आज रंगीत तालीम
विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी करण्यापूर्वी सोमवारी (ता. १३) दुपारी ४ वाजता मतमोजणी केंद्रावर रंगीत तालिम करण्यात येईल. यावेळी मतमोजणीसाठी नियुक्ती अधिकारी, कर्मचारी व इतरांची उपस्थिती राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.