अकोला : जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना जुलै महिन्यांपासून साखरेचे वाटप बंद आहे. शासनाकडून साखरेचा पुरवठा बंद असल्याने ऐण सणासुदीच्या दिवसात गरिबांना साखरेविणाच दसरा, दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
केंद्र शासनाने फेब्रुवारी, २००१ पासून केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच नियंत्रित साखरेचे वितरण करण्यात येत आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना अधिक साखर मिळावी याकरिता सुरुवातीला प्रतिमानसी ४२५ ग्रॅम ऐवजी ५०० ग्रॅम परिमाण ठरविण्यात आले होते.
त्यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाच्या नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्रीचा दर केंद्र शासनाने १ मार्च २००२ रोजी १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो निश्चित केला होता. परंतु नंतरच्या काळात साखरेच्या वाटपावर शासनाने नियंत्रण आणले. त्याअंतर्गत प्रतिमानसी येवजी प्रतिकार्ड साखरेचे वाटप करण्यात आले. त्यासह साखरेचे परिमाण सुद्धा प्रतिकार्ड एक किलो निश्चित केले.
त्यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय गटातील कार्डधारकांनाच प्रतिमाह एक किलो साखरेचे वाटप २० रुपये प्रतिकिलोने करण्यात येते. परंतु शासन स्तरावरून अंत्योदय कार्डधारकांसाठी साखरेचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना साखरेपासून वंचित रहावे लागत असून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून लाभार्थ्यांना साखरेचे वाटप करण्यात आले नाही. आनंदाच्या शिधासोबत साखरेचे वाटप करण्यात आले, मात्र त्याचेही वाटप सार्वत्रिक न झाल्याने लाभार्थ्यांना साखरेची प्रतीक्षा आहे.
असे आहेत लाभार्थी (सरासरी)
अंत्योदय कार्डधारक ४४ हजार ४७८
लाभार्थी संख्या १ लाख ८९ हजार ६५
अंत्योदय कार्डधारकांना जून महिन्यापर्यंत साखरेचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र शासन स्तरावरून साखरेचा पुरवठा न झाल्याने वाटपावर परिणाम झालेला आहे. शासनाकडे साखरेची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्याप पुरवठा झाला नाही.
- निखील खेमनार, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.