अकोला : सुपर स्पेशालिटी ‘जीएमसी’कडे हस्तांतरित

सुपर स्पेशालिटी रुग्णालय केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत तयार करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गुरुवारी हस्तांतरित केले.
super Specialty Hospital
super Specialty Hospital Sakal
Updated on

अकोला : कोट्यवधी रुपये खर्च करुन निमवाडी येथे उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय (super Specialty Hospital) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत तयार करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (Government Medical College) गुरुवारी (ता. ३०) हस्तांतरित केले. त्यामुळे सदर रुग्णालय सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून सुरुवातीला सुपर स्पेशालिटीमध्ये सुरुवातीला कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी २०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून लहान मुलांसाठी १८० खाटा राखीव असणार आहेत.

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली.

super Specialty Hospital
पुणे : नवीन कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवारी तीनशेच्या घरात

सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत होती. परंतु गत काही महिन्यांपूर्वी शासनाने पदनिर्मिता मंजुरी दिली आहे. त्यादृष्टीने सदर पदभरतीची प्रक्रिया

राज्य शासनाकडून लवकरच राबविण्यात येणार आहे.

दरम्यान सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे कंत्राटदाराने रुग्णालयाचा ताबा सोडला असून इमारत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) ताब्यात दिली आहे, तर सीपीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) सदर रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात दिले आहे.

super Specialty Hospital
सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर येरवड्यात हल्ला

डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती

कोविड रुग्णालयाच्या अनुषंगाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काम करण्यासाठी पूर्णतः कंत्राटी तत्वावर सहा सिनियर रेसिडेंट डॉक्टर तर आठ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासोबतच वर्ग ३ चे ६८ व वर्ग ४ चे कर्मचारी सुद्धा कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

सुरुवातीला २०० खाटांची व्यवस्था

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी रुग्णालयात रुग्णांना तूर्तास तरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दर्जाच्या सुविधा मिळणार नाहीत, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट सुरू झाल्यास ‘सुपर’मध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतील. त्यासाठी २०० खाटा सज्ज करण्यात येत असून १२० खाटा ऑक्सीजनसह लहान मुलांसाठी उपलब्ध राहणार आहेत. तर इतर ४० खाटा लहान मुलांसाठी आयसीयूच्या व ४० खाटा वयस्क व्यक्तींसाठी राखीव राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.