देऊळगाव राजा : मोबाईल मुळे शैक्षणिक कार्यात अडथळा येऊ नये, जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून शाळेच्या वेळेत शिक्षक आपली मोबाईल बंद ठेवतील असा स्वागतहार्य निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व शाळेची प्रगती साधता येणार आहे.
जिल्हा परीषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून तो आणखी वाढवा, पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल त्यामुळे जिल्हा परीषद शाळांची कमी होणारी पटसंख्या यावर अनेक उपाय योजना केल्या जातात.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी पालकांचा दर्जेदार शिक्षणाकडे असणारा कल, तसेच जिल्हा परीषद शिक्षकांची समाजात प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांचे मार्गदर्शनाखाली येत्या शैक्षणिक वर्ष पासून काही महत्त्वाचे प्रेरणादायी निर्णय घेतले आहेत.
देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा मागील काही वर्षा पासुन उंचावला आहे. तरीही पालकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षक संघटनेच्या माध्यमातून स्वयं प्रेरणेने काही निर्णय घेतले आहेत.ज्यामध्ये शालेय वेळेत कोणीही शिक्षक मोबाईल चां व्यक्तिगत वापर करणार नाही. शैक्षणीक कामासाठी अथवा अध्यापनासाठी वापर करायचा असल्यास मुख्याध्यापक यांचे परवानगीने व देखरेखीखाली करता येईल.
पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता या वर्षीपासून इयत्ता १ली व २री मध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्यात येणार आहे, तसेच दरमहा वर्ग निहाय पालक सभा आयोजित करण्यात येइल. इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशीप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, एनएमएमएस परीक्षा यांचे अतिरीक्त वर्ग घेण्यात येईल.
तरी पालकांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतच आपले पाल्यांचां प्रवेश घ्यावा, असे आवाहन सर्व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक संघ व सर्व शिक्षक संघटना यांचे वतीने करण्यात येते.
शासनाकडून विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बुट, सॉक्स, पुस्तके मोफत दिली जातात. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्हा परीषद शाळेतुन देण्यात येतो. शिक्षक संघटनांनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी स्वयं प्रेरणेने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
- दादाराव मुसदवाले, गटशिक्षण अधिकारी प स दे.राजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.