Akola News : हमालांची थकीत रक्कम देण्यासाठी स्वीकारली लाच, तेल्हारा बाजार समिती उपसभापतीला अटक

सभापतीविरुद्धही कारवाई; 1 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
telhara market Committee deputy chairman arrested for accepting bribe pay Hamal dues akola news
telhara market Committee deputy chairman arrested for accepting bribe pay Hamal dues akola newsesakal
Updated on

अकोला : मागील हंगामात बाजार समितीला शासनाच्या आधारभूत किमत योजनेअंतर्गत शेतमाल खरेदीसाठी हमाल पुरवठा करण्यात आला होता. त्यापोटी थकीत असलेली रक्कम मिळण्यासाठी बाजार समितीकडे पुरवठादाराने पाठपुरावा सुरू केला. मात्र, ही रक्कम काढण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली.

या प्रकरणी सोमवारी (ता.२५) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले यांच्याविरुद्ध कारवाई केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीला हमाल पुरवठा केला होता. तसा करार तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत केला होता.

त्यानुसार शासनाच्या दरानुसार प्रती क्विंटल ४४ रुपये याप्रमाणे एकूण १४ लाख ३९ हजार ५९२ रूपये बिल मिळण्यासाठी सचिव सुरेश सोनोने यांच्याकडे जून २०२३ मध्ये देयक सादर केले होते. हे बिल मंजूर होवून आजपावेतो तक्रारदाराला चार लाख ९३ हजार रुपये मिळाले. उर्वरीत नऊ लाख ४६ हजार ५९२ रुपये बाजार समितीकडून घेणे आहेत.

ही रक्कम मिळण्याबाबत तक्रारदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीला लेखी अर्ज दिला असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदिप ढोले व सचिव सुरेश सोनोने यांनी तक्रारदाराला बाजार समितीत बोलावून एक लाख रुपये लाचेची मागणी केली. ही तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली.

त्याअनुषंगाने २१ सप्टेंबरला लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविण्यात आली असता उपसभापती प्रदिप ढोले यांनी तक्रारदारास एक लाख रुपये लाचेची मागणी केली. सभापती सुनील इंगळे यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

telhara market Committee deputy chairman arrested for accepting bribe pay Hamal dues akola news
Akola News : अन् कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आले पैसे; सिड्स कंपनी झाली अलर्ट

त्यानंतर सोमवारी (ता.२५) सापळा कार्यवाही आजमाविण्यात आली असता, कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती प्रदिप ढोले यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

सभापती सुनील इंगळे यांना सुध्दा ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मारुती जगताप,

telhara market Committee deputy chairman arrested for accepting bribe pay Hamal dues akola news
Akola : अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

अपर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे, पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार, संदीप ताले, किशोर पवार, अभय बावस्कर, सुनील येलोने, पुरूषोत्तम मिसुरकर, अर्चना घोडेस्वार व चालक दिलीप तिवळकर यांनी केली.

एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन

भ्रष्टाचाराला प्रतिंबध घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.