Telhara Latest News in Marathi
तेल्हारा : खासगी शिकवणीत दोन मुलांमध्ये वाद झाला, हा वाद कुटुंबापर्यंत पोहोचला... दोन्ही कुटुंब आमनेसामने आले आणि हळूहळू ही ठिणगी शहरभर पसरली. शहरात तणाव निर्माण झाला. यात भर म्हणजे सोशल मीडियामुळे अफवाही पसरल्या. शहरातील दुकानं बंद करण्यात आली. अखेरीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगलविरोधी पथक असा फौजफाटा शहरात पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. ही घटना घडलीये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे.