Akola Riots : अकोला दंगलीतील मयत तरुणाच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी ठाकरे गटाने स्वीकारली तर भाजपने...

Akola Riots
Akola Riots
Updated on

अकोला : जुने शहरातील हरीहर पेठ परिसरात दोन समाजामध्ये झालेल्या वादात ठार झालेले विलास गायकवाड यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) स्वीकारली आहे.

मृतक गायकवाड यांच्या कुटुंबियांची ठाकरे गटाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने गायकवाड कुटुंबियांना रोख एक लाखाची मदत देण्यात आली. सोबतच मयताच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली.

यावेळी माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, नितिन ताकवाले, योगेश गिते, नितीन मिश्रा, अनिल परचुरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Akola Riots
Akola Curfew : अकोला जुने शहर, डाबकी रोड हद्दीत रात्रीची संचारबंदी

मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश

विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने चार लाख रुपये व भाजपतर्फे एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सोमवारी सोपविण्यात आला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते हे धनादेश सोपविण्यात आले.

गायकवाड परीवारीतील पाल्यांना आमदार वसंत खंडेलवाल यांचे वतीने शैक्षणिक खर्च दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माधव मानकर, वसंत बाछुका,  जयंत मसने, शिवसेनेचे मुरलीधर सटवाले, अमोल गोगे, संतोष पांडे, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, संजय गोटफोडे, अमोल गीते आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दाखल घेऊन तातडीने शासनाकडून आपत्कालीन मदतीचा धनादेश मयताच्या कुटुंबियांना सोपविल्याची माहिती आमदार सावरकर यांनी दिली. यावेळी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,  तहसीलदार सुनील पाटील, कदम, नंदकिशोर माहोरे व जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते.

Akola Riots
Akola Incident : कुटुंबातील एकमेव कमावणारा होता, अकोल्याच्या घटनेत जीव गमावला, कुटुंब झालं निराधार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.