तेल्हारा (अकोला): शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा प्रश्न व हमालांच्या मजुरीच्या प्रश्नावरून तेल्हारा खरेदी-विक्रीचे नव निर्वाचित प्रशासक मंडळांनी सहाय्यक निबंधक यांना (ता. २५) ऑगस्टला सांयकाळी धारेवर धरून शेतकरी व हमालांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
तेल्हारा तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यापासून मुख्य प्रशासक व प्रशासक यांनी शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या अंदाजे दोनशे क्विंटल च्या अफरातफरी बाबत तसेच हमालांच्या लाखो रुपयांच्या मंजुरी बाबतचे प्रश्न लवकर सोडविण्यात यावा. याकरिता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वारंवार मागणी करून हा प्रश्न सोडण्यास संबंधित अधिकारी वेळ काढू धोरण अवलंबित आहे. यामुळे अकोला येथील बैठकीत सहाय्यक निबंधक यांनी बुधवारी (ता. २५) ऑगस्टला येऊन सर्व प्रश्न सोडवतो असे सांगितले. परंतु खरेदी-विक्रीमध्ये प्रशासक मंडळांना सकाळी अकरा वाजतापासून ते साडेपाच वाजेपर्यंत बसून ठेवून निबंधक कार्यालयातून सहाय्यक निबंधक पळ काढून जात असल्याचे समजताच प्रशासक मंडळांनी सहाय्यक निबंधक यांना टावर चौक येथे गाठून त्यांना खरेदी-विक्रीमध्ये आणून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या पैशाचे काय झाले.
हमालांच्या मजुरीच्या लाख रुपयांचा प्रश्न का रेंगाळत ठेवला, खरेदी-विक्रीचे कागदपत्र व रेकॉर्ड कुठे आहेत. रेकॉर्ड उपलब्ध नसतील तर संस्थेचा कारभार कसा चालवायचा. यापूर्वी गेल्या एक वर्षापासून हा प्रश्न का रेंगाळत ठेवला. चार महिने शासकीय प्रशासक यांनी व आपण काय केले. आपणाला शेतकऱ्याच्या हरभराच्या पैशाचे हमालांच्या पैशाचे काही देणेघेणे नाही काय. इत्यादी प्रश्नांचा भडिमार करत सहाय्यक निबंधक यांना धारेवर धरून शेतकरी हमाल यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली. शेतकरी प्रशासक मंडळ व सहाय्यक निबंधक यांच्यामधील वाद विकोपाला जाऊ नये, यामधून काही अनर्थ होऊ नये, याकरिता खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पुंडलिकराव अरबट यांनी मध्यस्थी करून सहाय्यक निबंधक यांना सदर सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याबाबत सांगितले.
यावेळी खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष पुंडलिकराव अरबट, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले, खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे प्रशासक प्रकाश वाकोडे, बंडू नेमाडे, बंडू बिहाडे, सुरेशराव गिर्हे, रामभाऊ फाटकर, संजय पाथ्रीकर तसेच तेल्हारा बाजार समितीचे संचालक रवींद्र बिहाडे तसेच शेतकरी बांधव हमाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रकरण हाताबाहेर जात हे पाहून सहाय्यक निबंधक यांनी शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे सांगितले. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा खरेदी-विक्रीचे प्रशासक मंडळ, शेतकरी व हमाल विरुद्ध सहाय्यक निबंधक यांच्यामधील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.