शिरपूर जैन ः शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम नंधाना येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून व्हॉट्सॲपवर तरुणीचे बदनामीकारक स्टेटस ठेवल्याने उपरोक्त पीडित १८ वर्षीय तरुणीने २३ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचे वडील पुरुषोत्तम चुडामण बोरकर वय ४८, रा.नंधाना यांनी या प्रकरणी २४ जून रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (The young woman lost her life after posting defamatory status on WhatsApp)
शिरपूर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंधाना येथील एका तरुणाने गावातीलच १८ वर्षीय तरुणीचे बदनामीकारक स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवले होते. दरम्यान तो तरुण दररोज एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोरून चकरा मारून, वाईट उद्देशाने तिच्याकडे पहात होता. तरुणीला बदनामी असह्य झाल्याने २३ जून रोजी घरात कोणीच नसताना तिने गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली.
मृतक पीडित तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मंगेश संजय जाधव रा. नंधाना यांचे विरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ३०६ भादवी सह कलम ६७ आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे करीत आहेत.
The young woman lost her life after posting defamatory status on WhatsApp
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.