Akola Anganwadi Recruitment 2024 : अकोला तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची तीस पदे भरणार; २० ऑगस्टपूर्वी करा अर्ज

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातर्फे अकोला तालुक्यात मानधन तत्वावर अंगणवाडी मदतनीसांची ३० पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २० ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
thirty posts of anganwadi helpers will be filled in Akola  apply before 20th August
Anganwadi Workersakal
Updated on

अकोला : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातर्फे अकोला तालुक्यात मानधन तत्वावर अंगणवाडी मदतनीसांची ३० पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २० ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला तालुक्यातील लाखोडा खुर्द, ताकोडा, नावखेड, कौलखेड गोमासे, खोबरखेड, मजलापूर, सुलतान अजमपूर, सांगवी बु., सुकोडा नवा, वडद खुर्द, दुधाळा, गोत्रा, पळसो बढे (बु.), खांबोरा नवा, खेकडी, हिंगणा जुना,

बिरसिंगपूर, वाळकी, मिर्झापूर, कुंभारी, बोरगाव मंजू, शहापूर, जलालपूर, महादलपूर, गोंदापूर, पाचपिंपळ, वैराट, हिंगणा तामसवाडी या गावात प्रत्येकी एक व कानशिवणी येथे दोन पदांकरिता भरती करण्यात येत आहे.

thirty posts of anganwadi helpers will be filled in Akola  apply before 20th August
Anganwadi helper recruitment: भरती प्रक्रिया सुरु! अंगणवाडी मदतनीसांचे १४ हजार पदे; 'या' उमेदवारांना करता येईल अर्ज

सदर पदासाठी किमान इयत्ता १२वी उत्तीर्ण व स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. भरतीसंदर्भात तपशील संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पहावयास मिळेल.

गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत असे कार्यालयातर्फे कळविण्यात आले. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असून कुणाच्या भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.