कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!

- कोरोनाचा धोका वाढताच; लॉकडाउननंतरही संसर्गावर नियंत्रण नाहीच
कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!
कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!akola
Updated on

अकोला ः कोरोना (Corona) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा कोरोनाचा धोका वाढतच असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा सतत वाढत आहे. कोरोनामुळे मे महिन्याच्या १३ दिवसांतच दीडशेवर बळी गेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक नकोशा उच्चांकी २२ बळीची नोंद ८ मे रोजी करण्यात आली. कोरोना बाधितांसह मृतकांचा आकडा वाढत असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. Threat of corona in Akola district; One and a half hundred victims in 14 days!

कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर २०२० च्या महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती.

कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!
लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्की

त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर झाले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. नंतरच्या काळात रुग्ण संख्या घटत असल्यामुळे त्याचा आरोग्य विभागावरील कामाचा ताण कमी झाला होता.

परंतु फेब्रुवारी महिन्यापासून अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मार्च, एप्रिल २०२१ या महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनामार्फत नागरिकांवर निर्बंध सुद्धा लादण्यात आले. दरम्यान एप्रिल महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा सतत भर पडत आहे.

कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!
आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

अमरावती विभागात दुसऱ्या स्थानी

कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक असल्याने जिल्ह्याचा मृत्यूदर अमरावती विभागात १.६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक मृत्यूदर १.८ टक्के यवतमाळ जिल्ह्याचा आहे. तिसऱ्या स्थानी अमरावती १.५ टक्के, वाशिम १.२ टक्के तर बुलढाण्याचा मृत्यूदर ०.६ टक्के आहे.

कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!
सावधान! गावात गर्दी कराल तर सरपंचपद येईल धोक्यात!

अशी आहे महिन्यातील मृतकांची संख्या

तारीख मृतक

१२ मे - १०

११ मे - १०

१० मे - १८

०९ मे - १२

०८ मे - २२

०७ मे - ११

०६ मे - ११

०५ मे - ०६

०४ मे - ०६

०३ मे - १८

०२ मे - ११

०१ मे - १३

Threat of corona in Akola district; One and a half hundred victims in 14 days!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()