Success Story: जिद्द अन्‌ चिकाटीने यशाला गवसणी; तीन सख्ख्या बहिणी झाल्या डॉक्टर

मनारखेड्यातील सीआरपीएफ जवानाच्या मुलींनी घडविला इतिहास
three sisters become doctor inspiring story manarkhed village history paras akola
three sisters become doctor inspiring story manarkhed village history paras akolasakal
Updated on

पारस : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर तीन सख्ख्या बहिणी डॉक्टर बनल्या. पारस येथून जवळच असलेल्या मनारखेड या गावातील बहिणींनी इतिहास रचला आहे. मनारखेड येथील सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी भावलाल इंदोरे सध्या ‘सीआरपीएफ’मध्ये पोलिस उपनिरीक्षक असून, ते बेंगरुळू येथे कार्यरत आहेत.

अत्यंत हाल अपेष्टा सहन करून, प्रसंगी एक वेळ उपाशी राहून भावलाल इंदोरे यांनी सीआरपीएफमध्ये नियुक्ती मिळविली. आपल्या वाट्याला जे दुःख आले ते आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणाची ज्योत आपल्या मुलींमध्ये पेटवली. या सावित्रीच्या लेकीने आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठेविली.

आज रोजी त्यांच्या तिन्ही मुली डॉक्टर झाल्या आहेत. कु. प्रिया इंदोरे ही नागपूर येथू एम. बी. बी. एस झाली तर कु.प्रेरणा इंदोरे ही नागपूर येथून बी.डी.एस झाली आहे. त्यापाठोपाठ कु. ऋतुजा इंदोरेसुद्धा डॉक्टर झाली असून, ती जे .जे. हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे.

वडिलांची समाजसेवेची परंपरा पुढे चालविणार

वडील भावलाल इंदोरे आणि सौ.सविता यांच्या तिन्ही मुलींनी जिद्दीच्या बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची समाजसेवेची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार तिन्ही मुलींनी केला आहे.

भावलाल इंदोरे हे सी.आर.पी.एफ.मध्ये कार्यरत असतानाही गावात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. सन २०२१ पासून ते ता. २६ जानेवारी रोजी गावात संस्कारशील ,कष्टाळू आणि आपल्या सासू-सासऱ्यांचा सांभाळ योग्य रितीने करणाऱ्या सूनेचा सत्कार करतात. तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत. अनाथांना मदत करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.