Akola News : अकोला मार्गावरून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांच्या वेळेवर परिणाम होण्याची शक्यता

रेल्वे मार्ग बदलल्यामुळे प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता
Akola-Junction
Akola-Junctionsakal
Updated on

अकोला - दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील खरसिया रायगड तिसऱ्या चौथ्या विद्युत लाइन सेक्शनमध्ये भूपदेवपूर स्टेशनवर चौथी लाइन कनेक्टिव्हिटीसाठी १० ते २२ सप्टेंबर दरम्यान प्री आणि नॉन इंटरलॉकिंग काम करण्यात येत आहे.

यामुळे काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत आणि काही गाड्या परावर्तित मार्ग धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आली आहे. या कालावधीत प्रवाशांना असुविधा होणार असली तरी काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा वेग वाढेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. या कामामुळे अकोला मार्ग धावणाऱ्या १० गाड्या प्रभावित झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.