रिसोड : शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता रिसोड येथे १४ ऑक्टोबर रोजी रोजी महाविकास आघाडीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पाचशे ट्रॅक्टरसह शेकडोच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. अमरदास बाबा संस्थानच्या भव्य प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता १४ ऑक्टोबर रोजी रोजी महाविका आघाडीच्या वतीने आमदार अमित झनक यांचे नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे सर्व विषय असल्यामुळे मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
पाचशे ट्रॅक्टर सह शेकडोच्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते येथील अमरदास बाबा यात्रा मैदानापासून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात होऊन अष्टभुजा देवी चौक, आसन गली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिव्हिल लाईन मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आमदार अमित झनक यांच्यासह इतर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाशीम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीन हमी भाव द्यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर व ठिबकचे अनुदान जमा करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
मोर्चात ट्रॅक्टरधारक व शेकडोच्या संख्येने शेतकरी व काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणेदार भूषण गावंडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
प्रराज्यांतील व केंद्रातील भाजपप्रणित सरकारे शेतकरी विरोधी आहेत. सोयाबीन आयात धोरणाने सोयबीन उत्पादक शेतकरी नाडला जात आहे. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांचे सोयाबीन आले की परदेशातून आयात करते. शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावात विकला जात असताना या सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसत नाही. महाविकास आघाडीने या शेतकरीविरोधी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
- अमित झनक,आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.