कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू, २० नवे पॉझिटिव्ह

कोरोना
कोरोना
Updated on

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा शुक्रवारी (ता. २५) मृत्यू झाला. त्यासोबतच २० नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात ४१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Two more die of corona in Akola, 20 new positive)

कोरोना
पोटनिवडणुक; शिवसेनेचा स्वबळाचा नारा, काँग्रेसचे धोरण गुलदस्त्यातच



कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २५) जिल्ह्यात ७७३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७६१ अहवाल निगेटिव्ह तर १२ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या रुग्णांमध्ये २० रुग्णांची भर पडली. मृत्यूमुखी पडलेल्या दोन रुग्णांमध्ये वाडेगाव ता. बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला व दहीहांडा ता. अकोट येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सदर दोन मृत्यूनंतर जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १ हजार १२६ झाली आहे.

कोरोना
कोरोनाने 404 महिलांच्या कपाळावरील पुसले कुंकू


कोरोनाची सद्यस्थिती
-एकूण पॉझिटिव्ह - ५७५२९
- मयत - ११२६
- डिस्चार्ज - ५५९९०
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४१३


Two more die of corona in Akola, 20 new positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.