Akola : उतावळी प्रकल्प, ईसाई माता संस्थान परिसर पर्यटनस्थळ होणार; विकास आराखड्यास मान्यता

देऊळगाव साकरर्शा येथील ईसाई माता मंदिर संस्थान हा बंजारा समाजाच्या दृष्टीने आस्थेचा,श्रद्धेचा विषय असून समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत सेवालाल महाराज, रामराव महाराजांचे महत्त्वाचे स्थान
Utawali Project isai Mata Sansthan area will become tourist spot Approval in Development Plan
Utawali Project isai Mata Sansthan area will become tourist spot Approval in Development Plansakal
Updated on

मेहकर : महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या आज नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत आमदार संजय रायमूलकर गत दोन वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या देऊळगाव साकर्शा येथील उतावळी सिंचन प्रकल्प आणि ईसाई माता संस्थान परिसरातील निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी ४ कोटी ५७ लाख ७८ हजार रुपये मंजूर करण्यात आले.

देऊळगाव साकरर्शा येथील ईसाई माता मंदिर संस्थान हा बंजारा समाजाच्या दृष्टीने आस्थेचा,श्रद्धेचा विषय असून समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत सेवालाल महाराज, रामराव महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे. या परिसरातील उतावळी सिंचन प्रकल्प नैसर्गिकदृष्टीने संपन्न असून ते एक पावसाळी पर्यटनस्थळही आहे.

Utawali Project isai Mata Sansthan area will become tourist spot Approval in Development Plan
Akola Rain News : दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम; उशिरा पेरण्या झालेल्या शेतांमध्ये डवरणे, फवारण्या रखडल्या

इथे निसर्ग पर्यटन प्रकल्प शासनाच्या वतीने व्हावा, ही बंजारा समाजाची मागणी होती. प्रकल्प आराखडा वन विभागाच्या तज्ज्ञांच्या मदतीने तयार करून आमदार संजय रायमूलकर यांनी शासनाकडे सादर करून सतत दोन वर्षे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ४ कोटी ५७ लाखांच्या या प्रकल्पास आज महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने मंजुरी प्रदान केली.

Utawali Project isai Mata Sansthan area will become tourist spot Approval in Development Plan
Akola : स्थायीच्या सभेत उपाध्यक्ष-शिवसेना सदस्यांत जुंपली; उपाध्यक्षांनी ग्रा.पं.च्या विकास कामाची फाईल रोखल्याचा आरोप

घाटबोरी वन परिक्षेत्रात असलेल्या ईसाई माता संस्थाननजीक भव्य प्रवेशद्वार, पाथवे, राशी वन, बागबगीचे, आकर्षक बटरफ्लाय गार्डन, मंदिराभवती फेंसिंग, रेलिंग, शेड, निरीक्षण चौक्या, स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृक्षलागवड, बांबू लागवड, ट्री कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी, सुरक्षागृह उतावळी प्रकल्पात बोटिंगसाठी बोटची व्यवस्था,

पर्यटकांसाठी विश्रांती टेंट, वन तलाव, नाला बांध अशा विविध कामांचा या प्रकल्प आराखड्यात समावेश आहे. निसर्ग पर्यटनदृष्ट्या या स्थळांचा भरीव विकास केला जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.जी. टेंभूर्णीकर यांचे आ. संजय रायमूलकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.